yuva sanvaad

“मला श्वास घेता येत नाहीये..!”

अमेरिकेमध्ये कृष्णवर्णीय जार्ज फ्लॉईड यांना पोलीसांनी 25 मे 2020 रोजी मारून  टाकल्याच्या घटने नंतर कोरोनाच्या काळात देखील तेथील  कृष्णवर्णीय व श्वेत  लोकांनी लाखोंच्या संख्येने  रत्यावर एकत्र येत तीव्र  निदर्शने करत अन्यायाला वाचा फोडली. तसेतर अमेरीकेत असणारी सैन्य व पोलीसांची पकड यापासून कोणी अनभिग्नय  नाही.  परंतू झालेली घटना अत्यंत निर्दयी, अमानुष आणि निंदणीय होती. जार्ज फ्लॉईड यांच्या मृत्युनंतर झालेली हि निदर्शने हिंसकही होत गेली, संपूर्ण अमेरीकेत पसरलेली या निदर्शनांवर ताबा मिळवण्यसाठी तेथे इर्मजन्सी (आणीबाणी )लावावी लागली.या निदर्शनांचा आवाका इतका मोठा होता की वॉशिंग्टन येथील व्हाईट हाउस [अमेरिकी राष्ट्राध्यक्ष याचे निवास ]बाहेर देखील हजारो निदर्शक एकत्र जमले होते, व व्हाईट हाउसला संरक्षण देण्यसाठी सैन्यांचा ताफा ठेवावा लागला आहे.

 जार्ज फ्लॉईड यांचे सोबत घडलेली घटना काय होती ? 

जार्ज फ्लॉईड हे 46 वर्षाचे आफ्रीकी अमेरीकन कृष्णवर्णीय नगारिक होते, की ज्याला 6 वर्षाची लहान मूलगी आहे. यांचा जन्म उत्तर केरेलीना मध्ये झाला होता.  कामाच्या निमित्ताने ते अमेरिकेतील मिनिआपोलिसमधे आले होते. मिनिआपोलिसमधे जार्ज हे एका  रेस्टोरंन्ट मध्ये सुरक्षारक्षकाची नोकरी करीत होते. असे म्हणले जात आहे. याच रेस्टॉरंन्ट मालकाच्या घरी भाडेकरी  म्हणून  पाच वर्षापासून वास्तवास होते. 25 मे रोजी जार्ज फ्लॉईड यांनी 20 डॉलरची नोट देऊन सिगारेट खरेदी केली .ती नोट खोटी असल्याच्या आरोपात  पोलीसांनी  त्यांना अटक  केली  होती. कप फुडस् या दुकानातून सिगारेट पाकीट घेण्यासाठी जार्जने 20 डाॅलरची नोट दिली. पण दुकानदाराला वाटले 20 डॉलरची नोट नकली आहे आणि त्याने पोलीसांना कळवले.रात्री 8 वाजता हि घटना सूरू झाली. त्यानंतर काही वेळातच पोलीस तेथे आले आणि दुकानाच्या कडेला लावलेल्या कारजवळ दोन व्यक्तींसह जॉर्ज तेथे होते. तेथे आलेल्या पोलिसांपैकी थॉमस लेन यांने जार्जवर बंदूक रोखून हात वरती करण्यास सांगून आत्मसमर्पण  करण्यास सांगितले परंतू जार्जने यास विरोध केल्यानंतर त्यांना बेड्या टाकून अटक केली . त्यानंतर जॉर्जने विरोध थांबवला होता. पोलीसांनी खोटी नोट वापरल्याच्या आरोपावरून अटक करत असल्याचे जॉर्ज ला सांगितले. डेरेक चाउविन व इतर काही  आधिकारी यांनी जॉर्जला जबदरस्ती गाडीत बसवण्याचा प्रयत्न सुरू  केला .त्यावर जार्जने त्यास विरोध केला. चाउविनने जार्जला गाडीच्या बाहेर काढले व तोंडाकडच्या बाजूने खाली आडवे पाडले.त्यावेळी जार्जच्या हाताला बेड्या होत्या.चाउविनच्या सहकारी पोलीसांनी जार्जला दाबून ठेवले होते त्याच वेळी चाउविनने जार्जच्या मानेवर ताकदीने गुडघा रोवला व जार्जला दाबून धरले. यावेळी जार्जला श्वास घेता येत नव्हता. तो तळमळत होता.  यावेळी जार्जने आईची शपथ घेत  पोलीसांना सांगितले कि “मला श्वास  घेता येत  नाहीये..!” मला सोडून द्या. अशी आर्त मागणी करून देखील पोलीसांना जार्ज ची दया आली नाही. यानंतर चाउविनने या पोलीसाने जवळ जवळ 9 मिनिटांनी जार्जच्या मानेवरचा गुडघा काढला. दरम्यान चाउविनने जेए व्केंग या पोलीस आधिकार्‍याला  जार्जची नस तपासण्यास संगितलल्यावर त्याने काही जाणीव होत नसल्याचे सांगितले.या काळात ही चाउविनने मानेवरचा गुडघा काढला नव्हता बेशुध्द जार्ज यांना हेनिपीन काउंटी मेडिकल सेंटर या दवाखान्यात हालवण्यात आले.  डॉक्टरांनी जार्ज ला मृत म्हणून घोषीत केले. 

 जवळ जवळ 30 मिंटामध्ये चाललेल्या घटनेत अत्यंत वेदानादाई पध्दतीने जार्ज फ्लॉईड यांचा अंत झाला. या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला, कदाचित आपल्यापैकी काहींनी तो पाहिलाही असेल जार्ज च्या मानेवर पोलीसाने गूडघा रोवल्यानंतर जार्जने “मला श्वास घेता येत नाही ..!” याची जी वेदनादाई, तळमळून वाच्चता केली होती त्याच वाक्याची अमेरिकन नागरिकांनी घोषणा केली.  फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया असं करत करत जगभर निदर्शनं झाली.

भारतात डाव्या विद्यार्थी संघटना ए.आय.एस.एफ. सारख्या संघटनांनी या विरोधात निदर्शने केली. त्यानंतर सर्वत्र “मला श्वास घेता येत नाही..!” हिच घोषणा घूमत राहून या घोषणेने अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्वतःला बंकरमध्ये बंद केलं.( अशी चर्चा अमेरिकन प्रसार माध्यमांमध्ये आहे)

याच काळात ट्रम्प यांनी हातात बायबल घेवून चर्चला भेटी देण्याचे राजकारण सूरू केले, परंतू निदर्शक अत्यंत संवेदनशीलतेने निदर्शने करीत होते. काहि ठिकाणी त्यांनी गुडघ्यांवर उभा राहून माना खाली घातल्या तर काही ठिकाणी त्यांनी हात मागे बांधून पोटावर झोपून लोटांगन घातले, तर काही ठिकाणी निदर्शक हे मांडी घालून बसून या घटनेचा निषेध नोंदवला होते, काही मुस्लीमांनी पोलीसांपूढे नमाज पढत निषेध व्यक्त  केला.  त्याच्या उलट ट्रम्प यांनी अमेरिका धोक्यात असल्यानं मी सैन्याला पाचारण करून रस्त्यावर पसरलेल्या दहशतवादी निदर्शकांना सरळ करणार आहे असं टिव्ट केलं.  हुकूमशहा यापेक्षा वेगळ्या पध्दतीनं व्यक्त होवू शकत नाही हेच या ट्विट वरून स्पष्ट होतं . वर्णव्देशी, अल्पसंख्याक विरोधी मानसिकता, शोषीतांच्या बाजूच्या विचारांची हेटाळणी करण्याचे कारस्थान हे जागतिक प्रस्थापित व्यवस्था करीत असल्याचे हे चित्र आहे.  जागतीक शोषणकारी व्यवस्थेला हे हवे आहे. त्या शिवाय भौतिक प्रश्नांवरून दर्लक्ष करतात येत नाही. मानवतावादाला काळीमा फासणारी ही घटना सर्व जगाला हादरून सोडणारी होती.  या घटनेला सर्व जगातून विरोध झाला तसेच अमेरीकेत जवळ जवळ मोठ्या दोन डझनभर शहरात हा विरोध नोंदवला गेला.  मानवतावादाचे कित्येक प्रश्न यामूळे ऐरणीवर आले आहेत. मूळात तेथे असणारा वर्णभेद हा तिव्र राहिलेला दिसत नसला तरी देखील वर्णभेदाची मानसिकता संपलेली मात्र नाही.पोलीस व प्रशासनावर असलेली कृष्ण वर्णीय  विरोधी  मानसीकतेच्या कित्येक घटना अमेरीकेत घडत असतात.  परंतू जार्ज फ्लॉईड यांच्या मृत्यु नंतर या मानसीकतेवर तीव्र चर्चा होताना दिसत आहे. तरी देखील अमेरिका व संपूर्ण जगभर होणाऱ्या निदर्शनामध्ये कृष्णवर्णीय व गोरे असे दोन्ही वर्णाचे लोक एकत्र होते हे देखील लक्षात घ्यावे लागेल.

या सर्व बाबींच चर्चा करीत असताना असताना आपल्या भारतातील हि परस्थिती काही वेगळी नाही असेच दिसते, अमेरिकेतील जार्ज फ्लॉईड  यांना मानेवर गुडघा ठेवलेल्या पोलीसाने श्वास न मिळू देता मारून टाकले.तसेच आज भारतातील लोकशाहीवादी शक्तींचा श्वास रोखण्याचे कारस्थान येथील प्रस्तापित व्यवस्था करीत आहे. यातील ताजी घटना म्हणजे दिल्ली पोलीसांनी एप्रिलच्या सुरूवातीला जामिया मिलिया विद्यापीठाच्या एमफिल ची विद्यार्थीनी सफूरा जरगर दिल्ली दंग्याच्या पार्श्वभूमीवर अटक केली गेली आहे. ही अटक सीएए, एनआरसीला विरोध करणाऱ्या  निदर्शकांमधील ती एक असल्याचे कारण सांगून यूएपीए या देशद्रोहाच्या कायद्या अंतर्गत अटक केली गेली आहे.  सफूरा हि 27 वर्षाची विवाहित असून ती 21 आठवड्यांची गर्भवती आहे, ती Poly Cystic Ovarian Disorder  या आजाराने पिडीत आहे.  तीला  दिल्ली पटियाला हाउस न्यायालयाने जामीण फेटाळला आहे.  यात न्याायालय असे म्हाणते आहे की, जरी यांचा प्रत्यअक्ष काही भूमिका जरी नसली तरी,  आगीशी ठिणग्यांशी खेळताना आग वाढलीतर त्यास ठिणग्यांशी खेळणारा जबाबदार आहे.  विद्याथर्यांवर इतके भयानक कडक कायदे लावून विद्यार्थ्यांचा आवाज दाबला जात असल्याचे विद्यार्थी संघटना बोलत आहेत. देशात  सीएए, एनआरसी या कायद्यांना विरोध करणार्या विरोधकांना यूएपीए या देशद्रोहाच्या कायद्या अंतर्गत गुन्हे नोंद केले जात आहेत.  सरकार बहूमताच्या जोरावर काही कायदे संमत करते, लोकशाही मध्ये सरकारणे केलेले सर्वच कायदे सर्वांच्या उपयोगी किंवा समर्थन करण्या योग्य असतात असे नव्हे याचमूळे लोकशाही मध्ये अशा कायद्यांचा विरोध केला जात असतो.  परंतू सरकारला वाटते की, आपन केलेल्या कायद्याला कोणही विरोध दर्शवून नये व जो विरोध करीत त्यास आम्ही देशद्रोहि ठरवू.  हि हुकूमशाही प्रवृत्ती सरकार लोकशाही देशात जोपासत आहे व वाढवत आहे.  जामीया मिला विद्यापीठातील विद्यर्थी हेच म्हणत होते की, आम्ही संविधानीक मूल्यांच्या बाजूने उभे आहोत, लोकशाही पध्दतीने याचा विरोध दर्शवित आहोत.  मात्र दिल्ली मधील झालेल्या दंग्यामागे सीएए ला विरोध करणारे आहेत असे सांगून सरकार या अटक सत्र घडवून आणत आहे. परंतू सर्वसामान्य जनतेने हे पाहिले आहे की आरएसएस, एबीव्हीपी, भाजपाच्या कित्येक केडरेने शांततापूर्व सीएए अंदोलकांवर हल्ले घडवून आणले आहेत.  याचा अर्थ दंगेखोर कोण आहे हे सूर्यप्रकाशऐवढे स्पषट असताना देखील सीएए, एनआरसी विरोधकांचा आवाज बंद करण्याच्या हेतून हे सर्व होत आहे. अगदी जार्ज फ्लॉईड ला स्वास घेण्याची मुश्कील करून मारून टाकले गेले. तसाच काहीसा हा प्रकार आहे. आपण मानवतावादाची चर्चा अमेरिकेत घडलेल्या घटनेबाबत करत असताना एका गर्भवती महिलेला जामीन नाकारणे ही अमानवीय घटना आहे हे देखील लक्षात घ्यायला हवे. लहान मूले व गर्भवती महिलांसाठी जामीन मिळणे हे मानवतातवादी पार्श्वभूमीवर सहज सोपे असते परंतू हा जामीन नाकराला गेला हे डॉ. बाबासाहेबांच्या देशात घटलेली अत्यंत वेदनादाई घटना आहे.

जेएनयू विद्यार्थी नजिब अहेमद याचे गायब होणे असेल, पुणे दंगलीत मोहसीन शेख यांचा खून असेल, मोहम्मद इजराईल नावाच्या युवकाला बिहार मधील चंपारण्य जिल्ह्यात ‘जय श्रीराम ‘ चा नारा दे म्हणतं झुंडशाहीच्या आतंकवाद्यांनी चाकूने वार करून मारले. अशा कित्येक घटना येथे मानवतेला काळीमा फासणाऱ्या आहेत.  परंतू हिंदूराष्ट्र निर्मीतीच्या नावाने हे सर्व चालू आहे, सत्ताधिशां ची याला सर्व पध्दतीने संमत्ती आहे. वरील प्रत्येक घटनेत “मला श्वास घेता ये नाहीये..!” याच भावना दिसत आहेत.

                              लेखक
                    प्रविण मस्तुद, बार्शी,
                     मो.9960312963

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!