मंगळवेढा तालुक्यातील 23 ग्रामपंचायतीसाठी शेवटच्या दिवशी 910 उमेदवारी अर्ज दाखल.मुढवी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात ग्रामस्थांना यश.तालुक्यातील 23 ग्रामपंचायत साठी शेवटच्या दिवशी 910 उमेदवारी अर्ज दाखल

मंगळवेढा/अमीर आत्तार  -मंगळवेढा तालुक्यातील 23 ग्रामपंचायतीच्या 223 जागेसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 910 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून रात्री उशिरापर्यंत ऑफलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती.दरम्यान तेवीस ग्रामपंचायत पैकी मुढवी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात ग्रामस्थांना यश आले असून ही ग्रामपंचायत सलग सहा वेळा बिनविरोध काढण्यात ग्रामस्थांनी परंपरा कायम ठेवली आहे.

तालुक्यातील 23 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या असून बुधवार दिनांक 30 रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत संपत असल्याने तहसील कार्यालयाला जत्रेचे स्वरूप आले होते सुरुवातीला उमेदवारी अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जात होते मात्र वाढती उमेदवारांची संख्या व नेटवर्क प्रॉब्लेम मुळे 

निवडणूक आयोगाने आपला उमेदवारी अर्ज भरण्यास परवानगी दिल्याने शेवटच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत रांगेत असलेल्या उमेदवाराचे अर्ज करण्यात येत असल्याचे चित्र होते.

ग्रामपंचायत ग मी आहे उमेदार ही संख्या पुढीलप्रमाणे हुलजंती 71. मरवडे 74. बोराळे 74 . भोसे 60. कचरेवाडी 38. माचनुर 36. तमदर्डी 24. बालाजीनगर 31. तांडोर 29 सिद्धापूर 51. कात्राळ कर्जाल 21. ममदाबाद शेटफळ 19. मल्लेवाडी 19 नंदेश्वर 67 लेंडवेचिंचाळे 42. अरळी 39. सलगर बुद्रुक 49. माचनुर 36. मुढवी 9. घर्निकी18. कचरेवाडी 38 असबेवाडी 29. गणेश वाडी 37 डोणाज 42 लवंगी 31. असे 909 उमेदवारांनी 223 जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.

तेवीस ग्रामपंचायत मधील 82 प्रभागांमध्ये ही निवडणूक होत आहे तरी 31 रोजी उमेदवारी अर्जाची छाननी दुपारी तीन वाजेपर्यंत होत असून दिनांक 4 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे.दरम्यान तालुक्‍यातील तेवीस ग्रामपंचायतींपैकी केवळ मुढवी गावाला बिनविरोध करण्यात यश आले आहे

या ग्रामपंचायतीने तालुक्यामध्ये बिनविरोध करून एक वेगळा आदर्श निर्माण केल करून दिला आहे.

विनोद प्रक्रिया पार पाडण्यासाठी तानाजी खरात या गटाला यश आले असून ग्रामपंचायतीने सलग सहा वेळा आतापर्यंत बिनविरोध होऊन तालुक्यात राजकीय क्षेत्रात रेकॉर्ड मोडले आहे सर्वाधिक उमेदवारी अर्ज व बोराळे त्याच्या खालोखाल हुलजंती . हे तिन्ही गावे राजकीय दृष्ट्या सक्षम म्हणून ओळखली जाते 

Leave a Reply