Breaking News

भारतीय जैन संघटनेच्या वतीने १५ ऑगस्ट पर्यंत ५००० प्लाज्मा डोनर्सची यादी शासनाकडे सुपूर्द करण्याचा संकल्प

बार्शी/अब्दुल शेख-कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या चार महिन्यात भारतीय जैन संघटनेला (बीजेएस) कोरोना संदर्भात महाराष्ट्रातीलगावागावात वेगवेगळे कार्य करण्याची संधी मिळाली आहे. या सर्व अनुभवावरून असे दिसते कि कोरोनापेक्षा कोरोनाची भीती लोकांना जास्त त्रासदायक ठरत आहे.वास्तविक पाहता कोरोना झाल्यावर आपण त्यातून बाहेर येऊ शकतो, यावर लोकांचा विश्वास बसणे जरुरी आहे. कोरोनावर मात करून बरे होऊन आलेल्या व्यक्तीचा प्लाज्मा कोरोनाबाधित रुग्णाला दिल्यामुळे आपल्याला जीवनदान मिळू शकते व त्यातून आपण यशस्वीपणे बाहेर येऊ शकतो ही भावना लोकांच्यामध्ये निर्माण होणे आवश्यक आहे.
सध्या केंद्र व वेगवेगळ्या राज्य शासनातर्फे कोरोनाच्या संदर्भात प्लाज्मा थेरपीवरती गेल्या अनेक महिन्यांपासून संशोधन सुरु आहे. या प्रक्रियेसाठी थोडा कालावधी लागू शकतो.  या कालावधीत प्लाज्मा डोनर्सला शोधण्याचे व त्यांची संमती घेण्याचे काम सुरु केले तर कोरोना बाधितांवर विनाविलंब ईलाज होऊन त्यांना जीवनदान मिळू शकते.
या अनुषंगाने बीजेएसने संपूर्ण महाराष्ट्रात “बीजेएस प्लाज्मा डोनर्स जीवनदाता योजने” च्या माध्यमाने चळवळ उभी केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बीजेएसच्या कार्यकर्त्यांचे नेटवर्क आहे. त्यामुळे प्लाज्मा दान करण्यास पात्र असणाऱ्या ५००० व्यक्तींना प्रोत्साहित करून त्यांचे संमतीपत्र मिळवून शासनाला सुपूर्द करण्याचा निर्णय बीजेएसने घेतला आहे. यासाठी किमान १७ वर्षे पूर्ण किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्ती, कोरोना आजारातून बरे होऊन दोन आठवड्यांपेक्षा जास्त अवधी झाला आहे आणि इतर कोणतेही गंभीर आजार नसलेल्या व्यक्तीच प्लाज्मा देण्यासाठी पात्र आहेत. तरी बीजेएसच्या वतीने सर्व कोरोना योद्ध्यांना आवाहन करण्यात येते की महाराष्ट्र कोव्हीड मुक्त करण्यास वचनबद्ध आपण आपला प्लाज्मा दान करून एक पुण्याचे काम करावे. त्याच धर्तीवर सोलापुरात प्लस-मायनस यादी जिल्ह्यातून काढणार असून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अध्यक्षांना तशा सूचना देण्यात आले आहेत. 
प्रथमच सोलापुरात भारतीय जैन संघटनेचे विभागीय अध्यक्ष श्याम पाटील यांनी स्वतःचे प्लाजमा दान देण्याचे संमती पत्र राज्य उपाध्यक्ष केतन भाई शहा यांच्याकडे दिली आहे यासाठी राज्य उपाध्यक्ष केतन भाई शहा (9370420033)जिल्हा समन्वयक शाम पाटील (8999908660) जिल्हा समन्वयक प्रवीण कुमार बलदोटा (9922236966) जिल्हा समन्वयक धनश्री पानपट (7588418653) सोलापूर जिल्ह्यातून दक्षिण सोलापूर साठी अभिनंदन विभूते उत्तर (9420489343) सोलापूर साठी  साठी माया पाटील, (9422421957) प्रदीप बलदोटा करमाळा (9028555397), विराट मेहता (9422645551), माढा संजय गांधी (9422404499), माळशिरस, गोविंद बाफना (9822777000) बार्शी, रवी कोठारी पंढरपूर (9226912500), शैलेश मंगळवेढेकर सांगोला (9623660996), राहुल शहा मंगळवेढा (7756037011), महावीर कोळेकर मोहोळ (8308797282),अभय खोबरे , प्रत्येक तालुक्याची जबाबदारी यांच्याकडे दिली असून त्या तालुक्यातील प्लाजमा डोनरनी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन राज्य उपाध्यक्ष केतन भाई शहा यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!