Headlines

भगवान भक्तीगडावर होणाऱ्या दसर्‍या मेळाव्यात ऑनलाइन सहभागी व्हा – श्री मा सुनील कायदे यांचे आवाहन

प्रतिंनिधी/बालाजी सोसेभगवान भक्ती गडावर दसरा मेळावा ऑनलाईन होणार असून या मेळाव्यात ऑनलाईन सहभागी व्हावे असे आव्हान. कायंदे यांच्या वतीने करण्यात आले. भाजप राष्ट्रीय सचिव पदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच पंकजाताई मुंडे मेळाव्याला संबोधित करणार आहे. भक्ती गडावरील दसरा मेळावा म्हणजे राज्यातील नव्हे तर देशातील अठरापगड जाती प्रेरणा स्थळ आहे. दिवंगत स्वर्गीय गोपीनाथ जी मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शना खाली होणारा दसरा मेळावा त्यानंतर त्यांच्या निधनानंतर त्यांची कन्या व माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भक्ती भगवान गडावर या ठिकाणी होणारा दसरा मेळावा यावर्षी कोरोणा च्या पार्श्वभूमीवर यावर्षी ऑनलाइन दसरा मेळावा होणार आहे त्या कार्यक्रमाचे स्वरूप कसे असणार आहे .‌‌राष्ट्रसंत भगवान बाबा च्या प्रतिमेची मिरवणूक आपल्या गावात काढावी आपल्या गावातील कार्यक्रमस्थळी राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून दर्शन घ्यावे .दुपारी 12 वाजता मा.पंकजाताई गोपीनाथ मुंडे मौजे सावरगाव घाट येथे राष्ट्रसंत भगवान बाबाच्या जन्मस्थानी दर्शन  घेणार आहे त्यानंतर 12 वाजून 30 मिनिटांनी मा पंकजाताई गोपीनाथ मुंडे सर्व राष्ट्रसंत भगवान बाबा आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबा प्रेम करणाऱ्या सर्व जनतेला संबोधित करणार आहे. भगवान भक्ती च्या फेसबुक लाईव्ह च्या माध्यमांमधून संबोधित करणार आहे .असे आवाहन सुनील तोताराम कायंदे यांनी केले करण्यात आले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *