Headlines

बेजबाबदारपणे विद्वेशी वक्तव्य करणाऱ्या सुदर्शन चँनलचे मुख्य संपादक सुरेश चव्हाणके यांचा मुस्लीम सत्यशोधक मंडळाकडून तीव्र निषेध

प्रतीनिधि /पुणे –  मुस्लीम समाजातील जे विद्यार्थी प्रतिकूल परिस्थितिशी सामना आणि संघर्ष करुन युपीएससी परीक्षा देतात, या परीक्षेत  उतीर्ण होऊन फार कमी विद्यार्थी यशस्वीपणे आयएएस, आयपीएस, आयएफएस पदावर जाऊन सनदी आधिकारी होतात, भारतीय प्रशासन सेवेत योगदान देतात, या विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन त्यांचा उत्साह वाढवण्याऐवजी सुदर्शन चँनलचे संपादक सुरेश चव्हाणके यांनी आक्षेपार्ह विधान करुन धार्मिक द्वेष निर्माण केला आहे.
आयएएस होणारे मुस्लीम विद्यार्थी म्हणजे “शासन व्यवस्थेच्या सर्वात मोठ्या पदावरील मुस्लीमांची घुसखोरी” असा जावई शोध लावून या चँनलवर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाचा टीझर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. या कार्यक्रमासंदर्भातील ट्वीटला तर थेट पंतप्रधान आणि आरएसएसला टँग करण्यात आले. या अत्यंत आक्षेपार्ह आणि निषेधार्ह वर्तनाची दखल घेऊन सनदी अधिकारी आणि विद्यार्थ्यांनी तक्रार नोंदवली तसेच दिल्ली उच्चन्यायालयात याचिका दाखल केली. दिल्ली  उच्च न्यायालयाने या कार्यक्रमाचं प्रसारण रोखणारी नोटीस दिल्यामुळे होऊ घातलेला कार्यक्रम रद्द झाला असला तरी ह्या  बेजबाबदार वर्तनाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. 
सुरेश चव्हाणके यांनी द्वेषमूलक वक्तव्य करुन धार्मिक तेढ निर्माण केली आहेच शिवाय भारतीय संविधानाचा घोर अवमान केला आहे. 
मुस्लीम सत्यशोधक मंडळ सुरेश चव्हाणके आणि त्यांच्या सुदर्शन चँनलचा निषेध करुन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करीत आहे.  यामुळे मुस्लीम समाजाची जी बदनामी आणि हानी झाली त्याची भरपाई कशी करणार हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. या सुदर्शन चँनलवर भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने किमान बंदी घालून चँनलच्या अशा वर्तनावर प्रतिबंध करावा अशी मागणी मुस्लीम सत्यशोधक मंडळ करीत आहे.अशी माहिती मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमशुद्दीन  तांबोळी यांनी दिली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *