Breaking Newsyuva sanvaad

बालकामगार विरोधी दिन – चिमुकल्या जिवांची मते

 

                बालकामगार नकोच!!

बालकामगार आपल्या भारताला भेडसावणारी मोठी समस्या आहे. बर्याच ठिकाणी लहान मुलं आपल्याला काम करताना दिसतात. मग ते हॉटेल असो वा चहाची टपरी असो किंवा मग लहान लहान कंपन्या असो तसेच घर काम करण्यामध्ये ही मुलांचा समावेश असतो. याचे मुख्य कारण आर्थिक परिस्थिती आहे, आई-वडीलांचे कमी उत्पन्न, मोठे कुटुंब तसेच बरीच कारणं ही आहेत. यामुळे लहान वयातच मुलांना काम करण्यास भाग पाडले जाते. 


शहरी तसेच ग्रामीण भागात सुध्दा लहान मुलं काम करताना दिसतात. ज्या वयात शाळेत जाऊन शिक्षण घेण्याचे व खेळण्यांचे दिवस असतात त्या वयात मुल काम करताना दिसतात. अनेक सामाजिक संस्था कार्य करत आहेत पण या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन काम करणं गरजेचं आहे. 


बालकामगार ही समस्या मुळापासून नष्ट करायची असल्यास मुलांना शाळेत पाठवणे तसेच आरोग्य व गरजेच्या वस्तू मुलांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. आपण हि सुजाण नागरिक म्हणून १८ वर्षांखालील मुलांना काम न करु देणे. तसेच कुठे लहान मुलं काम करताना आढळल्यास चौकशी करणे. त्यांना शक्य होईल ती मदत करणे जेणेकरून ते त्यांचं बालपण जगू शकतील. 


बालमजुरी ही भारतात असू नये. त्यांना मोफत शिक्षण घेण्याचा हक्क आहे व त्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. 


देवांश आगिवले, ९वी 

साधना विद्यालय सायन

सलाम बॉम्बे फाउंडेशन, मिडीया अकादमी.   बालकामगार एक गुन्हा आहे


 मुलांकडून काम करवून घेणे गुन्हा आहे. त्यामुळे शारिरीक व मानसिक आरोग्यावर परिणाम होताना दिसतात. आपल्या देशात गरिबीमुळे अनेक ठिकाणी बालमजुरी केली जाते पण त्या गुलामी मुळे आपल्या देशाचा भविष्याचा विचार केला तर ते आपलेच नुकसान आहे. कारणं हिच लहान मुलं देशाचं भविष्य आहेत. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर लहान मुलांचे हे वय खेळण्यांचे, शिकण्याचे तसेच माणूस म्हणून घडवायचे आहेत. त्यामुळे बालमजुरी नकोच. 


बालकामगार हा एक गुन्हा आहे. कारखान्यात, हॉटेल, घरातील काम किंवा कुठे काम करताना दिसल्यास कारवाई केली जाते. तरी आपल्या भारतात उत्तरप्रदेश, बिहार आणि राजस्थान या राज्यात बालकामगारांची संख्या जास्त आहे. 


कैक कारणं आहेत बालकामगार वाढण्यामागे पण आपण सुजाण नागरिक म्हणून आपल्या परीने प्रयत्न करतं राहणं गरजेचं आहे. या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन काम करणं हिचं काळाची गरज आहे.


सदाफ फातिमा शेख, ९वी 

छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, सायन

सलाम बॉम्बे फाउंडेशन, मिडीया अकादमी         बालपण शिकण्यासाठी आहे.


बाल कामगार विरुद्ध २००२ ला यां प्रश्नांवर काम केलं पाहिजे या विचारानं हा दिवस जनजागृती करिता साजरा केला जातो. दरवर्षी १२ जुन या दिवशी मोठ्या उत्साहाने या दिवसांचे महत्त्व पटवून देण्याचे काम अनेक संस्था करत आहेत. बाल कामगार विरुद्ध आपण सर्वांनी काम करने गरजेचे आहे. 


अनेक ठिकाणी बालमजुरी करून लहान मुलांना मानसिक तसेच शारिरीक त्रास दिला जातो. आज पण सिंगल वर लहान मुलं गजरा विकत, फुगे विकत किंवा भिक मागताना दिसतात. जागतिक पातळीवर या प्रश्नाचा विचार केला तर दहा पेकी एक मुलगा बालमजुरी करत आहे. तर बालकामगार रोखण्यासाठी आपण जनजागृती करणे, कार्यक्रम आयोजित करणे जेणेकरून लोकांना या प्रश्नाच गांभिर्य कळेल. 


मुलांना शिक्षण मोफत आहेच पण त्यांना त्या शाळेच्या पायरी पर्यंत पोहचण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असने गरजेचे आहे. मुलांचे बालपण शिकण्यासाठी, खेळण्यासाठी असते त्यांचा वापर कमावण्यासाठी करु नये. 


भैरवी गडदे, ९वी 

साधना विद्यालय, सायन

सलाम बॉम्बे फाउंडेशन, मिडीया अकादमी


Abs News Marathi

Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!