बार्शी – बालाघाटातल्या भानसाळे गावानं घातला कोरोनाला बांध !


बार्शी/अब्दुल शेख – बार्शी शहरापासून 19 किलोमीटर लांब , डोंगराच्या कुशीत वसलेले भानसाळे. गावाच्या दक्षिणेस बालाघाटच्या डोंगररांगा आणि पश्चिमेस मराठवाडा भूमी. 31 जानेवारी 2020 रोजी भारत देशात पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला. 23 मार्च 2020 पासून देशामध्ये टाळेबंदी जाहीर करण्यात आली. त्या दिवसापासून आज पर्यंत भानसाळे या गावामध्ये नागरिकांनी कोरोनाला गावाच्या सीमेवर रोखून धरला आहे.

जेमतेम 88 उंबऱ्याच 460 लोकसंख्या असणार हे गाव. गावात वय वर्ष 60 पेक्षा अधिक असणारी 87 ,45 ते 59 मध्ये 72 , 18 ते 44 मध्ये 154 नागरीक आहेत.आजपर्यंत गावातील 20 लोकांचे लसीकरण झाले आहे.                                                                                                                                           


गावात एकही कोरोना रुग्ण न आढळण्याचे गुपित सरपंच सौ.शकुंतला हिरे सांगतात की आमच्या गावात आशासेविका व अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन नागरिकांचा सर्वे करता. यामध्ये लोकांच्या घरी जाऊन  ऑक्सिजन पातळी  तसेच शरीराचे तापमान तपासले जाते. गावातील कुणाला सर्दी , खोकला , ताप आहे का ! याची माहिती घेतली जाते.

आजतायगत गावामध्ये 59 रॅपिड टेस्ट करण्यात आल्या आहेत. गावामध्ये जर पंधरा दिवसाला सोडियम हायड्रोक्लोराइड ची फवारणी केली जाते. ग्रामस्थांची रोग प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी आर्सेनिक अल्बम या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. ग्रामपंचायतच्या वतीने नागरिकांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले.

गावाला कोरोना मुक्त ठेवण्यासाठी आशासेविका सीमा पाटील , सरपंच सौ.शकुंतला हिरे , उपसरपंच शीला हिरे ग्रामसेवक जी.वाय. जाधव , अंगणवाडी सेविका रुक्मिणी पाटील , जिल्हा परिषद शिक्षक सुरेश मुंढे ,हनुमंत मुंढे तसेच कोरोना दक्षता समितीचे सर्व सदस्य शर्थीचे प्रयत्न करत आहेत.


 आशा सेविका व त्यांची संपूर्ण टीम गावांमध्ये चांगल्या पद्धतीने काम करत आहेत.या कामाला ग्रामस्थ , लोकप्रतिनिधी व पदाधिकारी सहकार्य करत आहेत. यामुळेच भानसाळे मध्ये आजपर्यंत कोणाचा शिरकाव होऊ शकला नाही. यापुढेही गावात कोणाला शिरकाव होऊ नये यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत.- जी. वाय. जाधव , ग्रामसेवक भानसाळे                                                                                                                                                                                                                                टीप-बातमी कॉपी करू नये .-संपादक 

Leave a Reply