बार्शी बाजार समिती उभारणार १०० बेडचे कोविड सेंटर – सभापती रणवीर राऊत

बार्शी/प्रतिनिधी – बार्शी बाजार समितीच्या वतीने १०० बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. यासाठी बाजार समिती ची 30 एप्रिल रोजी तातडीची सभा बोलावण्यात आली आहे. या सभेमध्ये कोविड केअर सेंटर उभारणीच्या खर्चाच्या विषयास मंजुरी घेउन तसा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक यांच्यामार्फत पणन संचालक , पणन संचालक पुणे , महाराष्ट्र शासन यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. मंजुरी मिळाल्यानंतर कोविड सेंटर उभारण्यात येईल. अशी माहिती सभापती रणवीर राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

बार्शी तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना रोखण्यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबविल्या जातात. ह्या उपाय योजना  सध्या अपुऱ्या पडत आहेत.  बार्शी बाजार समितीच्या फळे भाजीपाला विभागातील सेल हॉल १० हजार चौ.फू क्षेत्रफळाचे आहे. सदर जागेत १०० बेडचे कोविड सेंटर उभारण्याची क्षमता आहे.

बार्शी बाजार समितीच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या कोविड केअर सेंटरमध्ये ५ डॉक्टर व 20 परीचालिका यांची मानधन तत्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच बाजार समितीच्या वतीने लसीकरणासाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. अशी माहिती सभापती रणवीर राऊत यांनी दिली.

यावेळी अल्प दरात रुग्णांना औषधे उपलब्ध करून दिली जातील.अशी माहिती मेडिकल असोशियन चे अध्यक्ष यांनी दिली. पत्रकार परिषदेस कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक रावसाहेब मनगिरे  , चंद्रकांत मांजरे , कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव व कर्मचारी  , मेडिकल असोसिएनचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply