barshiBreaking News

बार्शी तालुक्यात वीज पडून दोन बैल ठार

बार्शी/प्रतिनिधी- कोरोना आणि लॉकडाऊन यातूनच शेतकरी वर्ग अजुन सावरत नाहीं. त्यातच सोमवारी  दुपारी  झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. बार्शी तालुक्यातील जामगाव(आ) येथे पाच वाजता विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. यावेळी तेथील शेतकरी श्री हरी खांडेकर यांची  दोन बैले वीज पडून मरण पावली.हया घटनेचा पंचनामा करुन तात्काळ नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी जामगाव ग्रामस्थांकडून होत आहे.

बार्शी तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. मोठ्या प्रमाणात काढलेली पिके आणि तोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला. शेतकऱ्याला हे नुकसान न झेपणारे आहे.

 

Abs News Marathi

Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!