Breaking Newsyuva sanvaad

बार्शी च्‍या मेजर प्रा.अरूषा शेटे- नंदिमठ प्रजासत्‍ताक दिनाला कॅडेट्‍सची टीम घेवून जाणार दिल्‍लीला

बार्शी /प्रतिनीधी– बार्शी येथील श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयाच्‍या प्राध्‍यापीका अरूषा शेटे या दिल्‍ली येथे  प्रजासत्‍ताक दिना निमित्‍ताने  रजपथावर होणार्‍या संचलनास 26 एनसीसी कॅडेट्‍सची टिम घेवून जाणार आहेत. या टीमचे नेतृत्व कर्नल प्रशांत नायर कमांडर ऑफिसर हे करणार आहेत.

अधिक माहिती अशी की, दिल्‍ली येथे प्रजासत्ताक दिना निमित्‍ताने एनसीसी महाराष्ट्र कॉन्‍टीजन ची टिम दरवर्षी दिल्ली राजपथावर संचलन करीत असते. महाराष्ट्रातून एनसीसीचे पुणे या ठिकाणी निवड चाचणी शिबीरातून निवडलेले 26 कॅडेट्‍सची टिम 18 डिसेंबर 2020 रोजी विमानाने दिल्‍ली येथे जाणार आहे. या टिमला घेवून जाण्‍याचा बहुमोल मान बार्शी येथील झाडबुके महाविद्यालयाचे एनसीसी कंपनी कमांडर मेजर प्रा. अरूषा शेटे- नंदिमठ यांना मिळाला आहे.  त्‍यांच्‍या सोबत बारामतीच विवेक बेले हे देखील असणार आहेत.  देशाभरातून आलेल्‍या एनसीसी टिम मधून महाराष्ट्र टिम दरवेळी प्रथम-व्‍दितीय क्रमांक पटवत आली आहे.  त्‍यामुळे यावेळी प्रथम क्रमांक पटकवण्‍याच्‍या उद्‍देशाने हि टिम सज्‍ज असल्‍याची माहिती पुणे ग्रुप कमांडर बिग्रेडिअर सुनील लिमये यांनी दिली आहे.

कोराणा सारख्‍या महामारीत बार्शी सारख्‍या ग्रामीण भागातून  प्राध्‍यापीका आरूषा शेटे या प्रजासत्‍ताक दिनी संचलनाच्‍या कामी दिल्‍लीला जाणार असल्‍याने झाडबुके महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतरांमध्‍ये आनंदाचे वातावरण आहे. 

यावेळी बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्‍या चेअरमन प्रभाताई झाडबुके, संचालीका वर्षाताई ठोंबरे तसचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच.एस. पाटील यांनी आनंद व्‍यक्‍त करत शुभेच्‍छा दिल्‍या आहेत.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!