Headlines

बार्शीत लसीकरणत वशिलेबाजीचा आरोप , पारदर्शकता आणण्यासाठी ठिय्या आंदोलन

बार्शी/प्रतिनिधी – बार्शी शहर व तालुक्यामध्ये लसीकरणा प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार होत आहे. लसीकरण प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात वशिलेबाजी होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व दोषी कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते उमेश नेवाळे यांनी बार्शी तहसील कार्यालय समोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.


मागील काही दिवसांपासून बार्शी शहर व तालुक्यामध्ये लसीकरणाचा गैरव्यवहार, तसेच वशिला लावून लसीकरण होत असल्याचे निदर्शनास आल्याने दि ३१ मे पासून जोपर्यंत लसीकरणाचा पुरवठा सुरळीत होत नाही.अधिकारी पारदर्शकता बाळगत नाहीत तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती उमेश नेवाळे यांनी दिली.


आंदोलनाबाबत माहिती देताना ते असे म्हणाले की, आमच्या भागातील तसेच बार्शीतील वयस्कर लोकांच्या लसीकरणासाठी रांगा लागलेल्या पाहून आम्ही काही तरुणांना सोबत घेऊन लसीकरणासाठी रांगेत उभारलो असता लसीकरण केंद्रावर असे आढळून आले की शहरातील मान्यवर, लोकसेवक, नगरसेवक, व्यापारी व राजकीय लोकांशी संबंधित असलेले बडे हस्ती नागरिकांच्या लसीकरणाच्या रांगेत न उभे राहता ते थेट लसीकरणासाठी सभागृहात प्रवेश करताना व अधिकाऱ्यांच्या संगनमताने लसी घेताना आणि अधिकाऱ्यांशी वारंवार चर्चा करताना वशिला लावताना दिसून आले.


याबाबत अधिक माहिती विचारली असता सर्वच ठिकाणी अधिकारी व कर्मचारी हे उडवाउडवीची उत्तरे देत होती व अनियमितपणामुळे लसीकरण उपलब्ध नसल्याचे नेहमीच सांगण्यात येत होते व आले आहे. ज्या दिवशी लसीकरण उपलब्ध नाही असे सांगितले जाते, त्याच दिवशी तालुक्याच्या विविध भागात चोरून लस देत असल्याचे आढळून आले.

यावेळी आंदोलनकर्ते उमेश नेवाळे यांनी प्रशासनाकडे पुढील मागण्या केल्या आहेत. सोलापूर शहरामध्ये जिथे लसीचा स्टॉक उपलब्ध आहे त्याच ठिकाणी परत परत स्टॉक दिला जातो. परंतु दुसऱ्या ठिकाणी मात्र लस शिल्लक नाही असे सांगितले जाते.याची तात्काळ दखल घेऊन लसीकरणाचे नियोजन पारदर्शक करून सर्व ठिकाणी समान पद्धतीने लसीकरण उपलब्ध करण्यात यावे.बार्शी शहरातील व तालुक्यातील लसीकरण सुरू झाल्यापासून ते आत्तापर्यंतच्या लसीकरणाची तातडीने चौकशी करावी यात मोठ्या प्रमाणात वशिलेबाजी झाले असल्याने त्याची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे.आतापर्यंत बार्शी शहर व तालुक्याला किती लस आल्या व त्या कोणाकोणाला दिल्या याची संपूर्ण माहिती आम्हाला लेखी स्वरूपात मिळावी .बार्शी शहर व तालुक्यातील फ्रंट लाईन वर्करला आतापर्यंत किती लस दिल्या त्याची लेखी स्वरूपात माहिती मिळावी.सर्वप्रथम फ्रंट लाईन वर्कर यांना प्रथम प्राधान्य देऊन लसीकरण पूर्ण करून त्याच बरोबर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला नियमानुसार लसीकरण करून घेण्यात यावे.“वार्ड निहाय कुपन देण्याऐवजी वार्ड निहाय लसीकरण” केल्याने ४५ पुढील नागरिकांना रांगेत उभारण्याचा त्रास वाचेल म्हणून वार्ड निहाय लसीकरण करण्यात यावा यातही संपूर्णपणे पारदर्शकता असावी

Leave a Reply