बार्शीत पक्षांच्या घरट्यांचे व चारापाणी डब्यांचे वितरण

 

बार्शी/प्रतिनिधी  – जागतिक चिमणी दिनानिमित्त चार  सामाजिक संघटनांनी संयुक्तपणे उपक्रम राबवून, पक्षांसाठी अन्न, पाणी व निवारा उपक्रमात पुठ्ठ्याच्या नळीची ४०० घरटी, ६०० चारापाणी डबे, ४८० पाण्याचे प्लास्टीकचे टब इत्यादींची निर्मिती व उपलब्धता करण्यात आली. या उपक्रमाचे ऑनलाईन उदघाटन ज्येष्ठ पक्षीमित्र आणि ३४ व्या पक्षीमित्र संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रा.डॉ.निनाद शहा, आणि महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेचे अध्यक्ष, डॉ.जयंत वडटकर, अमरावती यांच्या हस्ते ऑनलाईन चित्रफित आणि मार्गदर्शनाद्वारे करण्यात आले. 

वीरशैव विद्या संवर्धिनी मंडळाच्या लिंगायत बोर्डिंग येथे हा उपक्रम पार पडला. यावेळी वीरशैव लिंगायत समाजचे अध्यक्ष विलास रेणके, जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष तुळशीदास मस्के, वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे, अॅनीमल फ्रेंडस संघटनेचे अध्यक्ष गणेश वाघमारे यांच्या हस्ते पक्षीमित्र गोविंद बाफणा, प्राणीमित्र धन्यकुमार पटवा यांना प्रातिनिधीक स्वरुपात पक्षांची घरटी आणि चारापाणीडबे देवून वितरणाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी आयोजक संस्थांनी उपक्रमाबाबत व वितरणाच्या नियोजनाची माहिती सांगीतली.

Leave a Reply