AarogyaBreaking NewsPolitics

बार्शीतील रस्त्याच्या दुरवस्थे बाबत थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार आणि आयोगाकडून दखल-सामाजिक कार्यकर्ते मनीष देशपांडे यांचा पुढाकार

मनीष देशपांडे यांनी घेतलेला पुढाकार हा नक्कीच बार्शीतील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी महत्वाचा ठरेल. सोबतच मानवाधिकाराकडून सुनावणी दरम्यान महत्वाचा निर्णय देण्यात आल्यास याचा फायदा अन्य भागासाठी सुद्धा होऊ शकतो ही एक महत्वाची बाब आहे.

बार्शी -महाराष्ट्र मधील सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी येथे गेली दोन वर्षे चालू असलेल्या अंडरग्राउंड गटारीसाठी रस्त्याचे खोदकाम चालू होते,अंडरग्राउंड गटारीचे काम पूर्ण झाले, परंतु रस्त्याची अवस्था खूपच बिकट झालेली आहे.
भारतीय संविधानाच्या कलम २१ नुसार प्रत्येक भारतीयाला सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा अधिकार आहे. या कलमाची व्याप्ती खूप मोठी आहे. माणसाला सुखकर जीवन जगण्यासाठी महत्वाचे सर्व घटक यात अंतर्भूत आहेत. इतर घटकांप्रमाणे चांगले रस्ते हा सुद्धा सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा एक घटक आहे. 
अनेक उच्च न्यायालयांनी विविध खटल्यात स्पष्ट केलं आहे की चांगले व खड्डे मुक्त रस्ते असणे हा प्रत्येक भारतीयांचा मूलभूत अधिकार आहे.परंतु या अधिकाराची सर्रासपणे पायमल्ली होतांना दिसत आहे. 
मानवाधिकार आयोगाने मानवाचे जीवन जगण्याचे उल्लंघन होत असून घेतलेले आरोग्याचे होणारे नुकसान व परिणाम…
१) मानवाचे अपघात आणि मानवाच्या शरीरावर परिणाम होत आहे.
२) रस्त्याच्या धुळीमुळे मानवाच्या श्र्वसणावर परिणाम होऊन दम्याचे आजार होत आहे.
३) तसेच धुळीमुळे डोळ्यांवर देखील परिणाम होत आहेत.
४) रस्त्याच्या कडेवरील दुकाने, हॉटेल मधील खाद्यपदार्थांवर धुळे मुळे रोगराई होत आहेत.
५) सतत आरोग्याची तपासणी करून अनेक आर्थिक अडचणी अडचणी येत आहेत.
६) सर्वात जास्त म्हणजे त्याचा परिणाम लहान मुलांवर,बालकांवर होत आहेत.
तसेच वाहन वर होणारे परिणाम
१) रस्ते खराब असल्यामुळे वाहने खिळखिळा होत आहेत. त्यामुळे मेंटेनन्स चा खर्च वाढून मानसिक ताण येत आहेत.
२) वाहनांची सतत दुरूस्ती करावे लागत असून आर्थिक अडचण येत आहे त्यामुळे मानसिक त्रास तसेच आर्थिक ताण येत आहेत.
बार्शी येथील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यात प्रामुख्याने आरोग्याच्या प्रश्नासोबतच वाहनांची खराबी होऊन लोकांचा आर्थिक त्रास सुद्धा वाढत आहे. गेली दोन वर्षे हा त्रास लोकांना सहन करावा लागत आहे. परंतु याकडे सर्वप्रकारे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
परंतु हा प्रश्न गंभीर असून यात मानवाधिकारांचे कश्याप्रकारे उल्लंघन होत आहे याचा सविस्तर अभ्यास करून बार्शीतील सामाजिक कार्यकर्ते मनीष देशपांडे यांनी थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत त्यांनी ही तक्रार पुढील कारवाही साठी राज्य मानवाधिकार आयोगाकडे सोपवली आहे आणि काही दिवसात या तक्रारीवर सुनावणी मानवाधिकार कोर्ट मध्ये होणार आहे.तसेच बार्शीमधील प्रशासनाला सुद्धा त्यांनी विनंती केली आहे कि रस्ते लवकरात लवकर पूर्ण करावे व बार्शी मधील नागरिकांचा त्रास कमी करावा. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!