बार्शीच्या स्वच्छ , धुळमुक्त ,खड्डेमुक्त्त रस्त्यासाठी नागरिकांसोबत संवाद


 बार्शी/प्रतींनिधी -बार्शी नगरपालिकेचे समोर बार्शी शहरातील भुयारी गटार योजना, खराब रस्ते व इतर मागण्यासाठी गेली आकरा दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलनास बसलेले राष्ट्रीय आंदोलन समन्वयक मनिष देशपांडे यांच्या आंदोलनाचा उद्या बारावा दिवस आहे. बार्शी नगरपरिषद प्रशासन यांचेकडून कोणतेही ठोस उत्तर किंवा मागणी पूर्ण होत नसल्यामुळे बार्शी नगरपरिषद कर्मचारी व सत्ताधारी नगरसेवक यांना गांधीगिरी मार्गाने गुलाबाचे फुल देऊन स्वागत करण्याचे आंदोलन, खड्यात झाड लावणे, संविधानाची उद्देशिका वाटप आणि इतर आंदोलनही यावेळी करण्यात आली.

या बेमुदत धरणे आंदोलनास विविध सामाजिक संस्था संघटना व सामाजिक कार्यकर्ते यांचा पाठिंबा वाढत आहे कालच अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी  जनआंदोलन न्यास संघटनेच्या वतीने देखील मनीष देशपांडे यांच्या आंदोलनास व त्यांच्या कार्यास पाठिंब्याचे पत्र व भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे पत्र जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांना पाठवले आहे. उद्या मंगळवार दिनांक 22 डिसेंबर 2020 रोजी संध्याकाळी ६ वाजता देखील मनीष देशपांडे, जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय,बार्शी समन्वयक यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी तसेच बार्शी शहरातील विविध समस्या याबाबत नागरिकांशी संवाद साधण्यासाठी इन्क्रेडिबल किसान और मजदूर संघ राष्ट्रीय अध्यक्ष असलम बागवान,जनआंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय, पुणे विभाग समन्वयक इब्राहीम खान,स्वराज अभियान महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष मानव कांबळे व आधी सामाजिक क्षेत्रातील मान्यवर बार्शीतील नागरिकांची संवाद साधणार आहेत. 

Leave a Reply