बार्टीतर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ऑनलाइन जयंती साजरी

उस्मानाबाद/पुरोषोतम बेले ::-  महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या वतीने राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे(भापोसे),मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे,दिलावर सय्यद, कीर्ती शेलार, जिल्हा प्रकल्प अधिकारी तुषार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती ऑनलाईन पद्धतीने साजरी करण्यात आली. त्यामध्ये प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री गुंडू गणपती जाधव (उपसरपंच नागराळ), प्रमुख व्याख्याते प्रा. वैभव बिराजदार (संचालक :- ज्ञानमुद्रा टुटोरियल, कॅन केयर रिसर्च फाउंडेशन मेंबर हे होते. यावेळी वैभव प्रा. बिराजदार  यांनी साहित्य रत्न लोकशाहीर  अण्णाभाऊ यांचे सामाजिक कार्य वर्तवले त्यामध्ये त्यांनी गायलेल्या छक्कड,पोवाडे,समाजप्रबोधन जीवनपट, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी माहिती दिली. त्यानंतर तानाजी माटे पो. पाटील यांनी अण्णाभाऊ साठे यांचे वंचित घटकांना केलेले सहकार्य आणि त्यांचे समाज प्रबोधन सांगितले. अण्णाभाऊ यांनी लिहिलेले फकिरा कादंबरी या विषयी माहिती दिली त्याच बरोबर कोरोना विषयी जनजागृती या विषयी मार्गदर्शन केले.  समतादूत नागनाथ फुलसुंदर यांनी बार्टीच्या कोरोना महामारीच्या काळातील बार्टी च्या योजना सांगितल्या. या कार्यक्रमास नवनाथ जाधव, रोहन रोडगे, लक्ष्मण रोडगे, अशोक गोरे, वैशाली सोनवणे, धोंडिबा जाधव, सोहेल लोगडे, समतादूत रमेश नरवडे,सुहास वाघमारे,गोविंद लोमटे,गणेश मोटे, अर्चना रणदिवे यासह अण्णाभाऊ साठे जयंती समितीचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात झूम च्या मद्यमातून ऑनलाइन उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समतादूत किरण चिंचोले यांनी केले तर आभार अध्यक्ष गुंडू जाधव यांनी मानले.

Leave a Reply