Headlines

‘बारावी’ला संविधानिक शिक्षण अनिवार्य करा विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

CBSC बोर्ड ने सविंधानिक मूल्य,सामाजिक आंदोलन,स्त्री शिक्षा,लोकतांत्रिक अधिकार पाठ्यपुस्तकातून वगळण्याचा विरोध

प्रतिंनिधी -भारतीय राज्यघटनेचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजावेत याकरिता राज्यात बारावीच्या परीक्षांसाठी त्या त्या भाषेमधून संविधानिक शिक्षणाचा ५० गुणांवर आधारित पेपर अनिवार्य करावा .शिक्षकांसाठी संविधानिक मूल्यांबाबत प्रशिक्षण कार्यक्रम आखाया अशी विनंती करणारे पत्र विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. या तज्ज्ञ मंडळींमध्ये ज्येष्ठ विचारवंत डॉ रावसाहेब कसबे,राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष डॉ.गणेश देवी, डॉ.यशवंत मनोहर , विचारवंत प्रा. हरी नरके ,प्रा.वामन केंद्रे,हेरंब कुलकर्णी,ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी,प्रज्ञा दया पवार,संविधान प्रचारक शाहीर संभाजी भगत, सुषमा देशपांडे,सुभाष वारे,डॉ.महेश केळुस्कर , आनंद पटवर्धन आदींचा समावेश आहे

संविधान हे धोक्यात असून लवकरात लवकर संविधान मूल्यव्यवस्था जनतेपर्यंत पोहोचावी – संविधान प्रचारक शाहीर संभाजी भगत

संविधान प्रचारक शाहीर संभाजी भगत म्हणाले संविधान होऊन ७० वर्ष झाली तरी अजूनही संविधान व संविधान चे उद्धेशीका मूल्य जनतेपर्यंत पोहोचले नाहीत तर संविधान हे धोक्यात आहे.९ ओगोस्ट 2018 ला दिल्ली ला जंतर मंतर वर संविधान जाळले गेले तरी संविधान ने दिलेली संसद,मंत्री,खासदार,आमदार आणि संविधान ने स्वातंत्र्य दिलेली मीडियाला तसेच संविधान ने सर्वांना मतदान अधिकार दिला ते मतदार यांनी सुद्धा याची चर्चा केली नाही अशी खंत संविधान प्रचारक शाहीर संभाजी भगत यांनी व्यक्त केली म्हणून लवकरात लवकर संविधान जनतेपर्यंत नेहून भारतीय संविधान हे फक्त भारतीय जनतेचा मुक्तीचा जाहीरनामा नसून तो समग्र मानवजातीचा मुक्तीचा जाहीरनामा जनतेपर्यंत पोहोचावी असे आवाहन जनतेला व संविधान प्रेमी यांना केले.

शालेय पाठ्यपुस्तकात संविधानाची माहिती देणारे धडे समाविष्ट केले जावेत. – प्रा.हरी नरके.

 शालेय पाठ्यपुस्तकात संविधानाची माहिती देणारे धडे समाविष्ट केले जावेत.संविधान हा विषय काहीसा किचकट असल्याने तो कशा पद्धतीने शिकविला जावा याचे प्रशिक्षण शिक्षकांना द्यायला हवे.नागरिकांचे साविधानिक शिक्षणाबाबत प्रबोधन करणे हा यामागील हेतू आहे.

भारतीय संविधान खिळखिळे करण्याचा डाव उधळून लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन  – डॉ.गणेश देवी

धर्मनिरपेक्षता आणि राष्ट्रीय एकात्मता याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करून, लोकशाही गणराज्याचे मूलाधार असलेले भारतीय संविधान खिळखिळे करण्याचा डाव उधळून लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन डॉ.गणेश देवी यांनी संविधान कार्यकर्त्यांना केले.


महाराष्ट्रातील प्रागतिक साहित्यिक,कलावंत आणि विविध व्यावसायिकांनी गेल्या महिन्याभरापासून ‘अभ्यासक्रमात संविधान’ ही मोहीम सोशल माध्यमांद्वारे चालवली आहे. इयत्ता पाचवी ते नववीच्या अभ्यासक्रमाला जोडून संविधानातील महत्वाच्या तरतुदी शिकविणे सहज शक्य आहे.संविधान शालेय स्तरापासूनच मुलांवर बिंबवल्यास राष्ट्र उभारणीत ते योग्य दिशेने आपल्या क्षेत्रात कार्य करू शकतील यासाठी याची अंमलबजावणी करावी असे मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या पत्रात म्हणले गेले आहे.

तसेच सीबीएसई बोर्डाने यावर्षी भारतीय संविधानातील महत्त्वाचे घटक,कोविडचे कारण देऊन अभ्यासक्रमातून वगळल्याबद्दल या सर्व विचारवंत, लेखक, सामाजिक कार्यकर्ते, संविधान प्रचारक व संविधान प्रेमी यांनी तीव्र असमाधान व्यक्त करण्यात आले.या घटनाविरोधी निर्णयाचा पुनर्विचार करून हे घटक विनाविलंब विनंती या सर्वांनी केली.

संविधान प्रचारकांची विरोध दर्शवण्यासाठी सर्व संघटना कडून मेल पाठवण्याची मोहीम.

या घटनाविरोधी निर्णयाचा पुनर्विचार करून हे घटक अभ्यासक्रमात पुन्हा समाविष्ट करण्यासंबंधीची सूचना जारी करावी म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक घटना संरक्षक नागरिकांनी [email protected]आणि [email protected] या पत्त्यांवर ई-मेल पाठवावेत,असे आवाहन या मोहिमेचे समन्वयक संविधान प्रचारक तसेच लोकशाहीर संभाजी भगत, डॉ. महेश केळुसकर, अल्लाउद्दीन शेख, हेरंब कुलकर्णी,जालिंदर सरोदे आणि मारुती शेरकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *