बाबुराव चव्हाण यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमाने साजरा

नळदुर्ग/पुरोषत्तम बेले  – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य बाबुराव (भाऊ) मधुकरराव चव्हाण  यांचा  वाढदिवस विविध समाजोपयोगी कार्यक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला.   राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे सुपुत्र व अणदूर जिल्हा परिषद गटाचे सदस्य बाबुराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाश जगदाळे यांच्या स्मरणार्थ आशिष जगदाळे यांच्यावतीने होर्टी ता. तुळजापूर येथील होतकरू व गरीब कुटुंबातील रितेश रणसुरे व रुपेश गायकवाड या दोन विदयार्थ्याना महत्वकांक्षी विदयार्थी दत्तक कार्यक्रमात  आशिष जगदाळे यांच्यावतीने  दत्तक घेण्यात आले. यावेळी  दत्तक घेण्यात आलेल्या विदयार्थ्यांना जीवनावश्यक वस्तु, किराणा माल ,कपडे आदीसह शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. होर्टी येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमास  होर्टीचे विद्यमान सरपंच संजय गुंजोटे, नळदुर्ग शहर शिवसेना प्रमुख संतोष पुदाले ,अनिल भोसले, कै. देवरावजी चव्हाण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यशवंत गायकवाड, शाम कनकधर  ,सचिन मुळे, अमर पिच्चे, सुधाकर गायकवाड, विशाल मोटे ,योगेश माने  आदींची  प्रमुख  उपस्थिती होती. 

Leave a Reply