Breaking News

फेसबुकवर रंगणार क्रांतीदिन व्याखानमाला

पंढरपूर /रविशंकर जमदाडे -कर्मवीर वाचनकट्टा परिवार व ज्ञानक्रांती अकॅडमी पंढरपूर यांच्या वतीने क्रांतीदिनाच्या निमित्ताने वेब व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आले आहे .  ही व्याख्यानमाला 5 ऑगस्टपासून फेसबुकवर सुरू होईल. यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत वक्ते आपले विचार व्यक्त करणार आहेत. दिनांक 5 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता मा. सुजित काळंगे ( सातारा ) हे – जगण्याची प्रगल्भ पाऊलवाट – वाचन या विषयावर मनोगत व्यक्त करतील. दिनांक 6 ऑगस्ट रोजी मा. अश्विनी टाव्हरे ( पुणे ) या भक्ती प्रेमावीण ज्ञान नको देवा या विषयावर मनोगत व्यक्त  करतील. दिनांक 7 ऑगस्ट रोजी मा. ज्ञानेश भुकेले ( कोल्हापूर ) हे  माध्यमांच्या विळख्यात सामाजिक जडण घडण दिनांक 8 ऑगस्ट रोजी मा. अनिकेत म्हस्के ( औरंगाबाद ) गुणवंताची स्वप्न उध्वस्त करणारी चित्रपटसृष्टी ? या विषयावर मनोगत व्यक्त करतील. दिनांक 9 ऑगस्ट रोजी मा. उद्देश पवार हे – सामर्थ्य हे चळवळीचे या विषयावर मनोगत व्यक्त करतील. सर्व व्याख्याने फेसबुकवर live होतील. ही सर्व व्याख्याने  @karmveerpariwar या पेजवर ऐकता येतील. अशी माहिती प्रा. समाधान काळे व समन्वयक दुर्गेश काळुंके यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!