प्रेरणा पुरुष साने गुरुजी

२४ डिसेंबर १८९९ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील, दापोली तालुक्यात `पालगड´ गावी पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच आपल्या सर्वांचे आदर्श गुरुजी साने गुरुजी यांचा जन्म झाला. लहानपणीच या पांडुरंगाला संस्कारांची संपत्ती लाभली. गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक गोष्टी जोडल्या होत्या. मुलांवर संस्कार व्हावेत म्हणून त्यांनी विपुल लेखन केले.त्यांच्या गोड गोष्टी वाचून मुलांचे बालपण फुलले.`श्यामची आई´ हे पुस्तक त्यांनी १९३३ मध्ये नाशिकच्या तुरुंगात ५ रात्रींमध्ये लिहून काढले आणि ते पुस्तक महाराष्ट्राच्या घरा घरात पोहोचले . त्यांचा ‘पत्री’ हा काव्यसंग्रह मराठी मनाला उत्साह देऊन गेला. ‘धडपडणारी मुले’, ‘क्रांती’, ‘आस्तिक’ इत्यादी त्यांच्या चरित्रातून गुरुजींच्या प्रखर लेखणीची ओळख होते. गुरुजींनी १९४८ सालच्या स्वातंत्र्यदिनी ‘साधना’ साप्ताहिक सुरु केले. त्या साधनेतून ते समाजातील तरुणांशी बोलत होते. ‘भारतीय संस्कृती’ या महान ग्रंथात त्यांनी स्वातंत्र्य, एकता, समता, विज्ञान, विकास, श्रद्धा, अध्यात्म अशा अनेक गोष्टींवर चिंतन केले आहे. समाजातील जातीभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ठ रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात जातपात न पाहता सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून गुरुजींनी उपोषण केले. नंतर त्यांना त्यासाठी अटक झाली. परंतु तुरुंगात गेल्या नंतरही  त्यांची समाजसेवा आणि जनप्रबोधन चालू होते.प्रांताप्रांतात एकोपा व्हावा आणि एकमेकांचा विचार एकमेकांना समजावेत म्हणून त्यांनी ‘आंतरभारती’ ही चळवळ सुरु केली. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत गुरुजी समाजाचाच विचार करत होते. १९५० मध्ये त्यांनी आपल्याला कायमचा निरोप दिला. आपल्या जीवनात गुरुजी आपले प्रेरणादायक व्यक्ती बनू शकतात ते कसं ? हा तुम्हाला प्रश्न पडला असेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण हार न मानता गुरुजींना आठवून कोरोना संकटाला हरवून दाखूया. 


 श्रावणी भांदुर्गे / ८वी
 साधना विद्यालय, सायन.

Leave a Reply