Breaking Newsyuva sanvaad

प्रेम…………….

प्रेम म्हणजे नक्की काय असतं,
ती दिसता क्षणी मनाला काही तरी भासतं
ती चोरून बघते तेव्हा असं काही वाटतं की,
माझं मन कासावीस होऊन उठतं,
ती हसते तेव्हा असं काही वाटतं की
माझं दुःख एका क्षणी मिटत
ती बोलली तेव्हा अस काही वाटत की
एक मधूर स्वर आपल्याला तिच्याकडे खेचत
ती रागावते तेव्हा अस काही वाटत की
तिच्या त्या रागावण्यात खरं प्रेम लपत
ती जेव्हा दिसत नाही तेव्हा अस काही वाटत,
माझं मन कोणालातरी शोधत असत.
ती जवळून जाताना असं काही वाटत की,
तिच्याकडे पाहिल्याशिवाय राहवलं नसत.
ती समोर असताना अस काय वाटत की,
तिच्याकडे पाहिल्यावर मन भानावर नसतं
हे सर्व काही नसून तर हे फक्त
प्रेम असतं…. प्रेम असतं…

कवी- किरण साळुंके
श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालय बार्शी
राज्यशास्त्र विभाग

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!