Headlines

पोलिसांनी दाखवली माणुसकी , वृद्धावर केले अंत्यसंस्कार


पंढरपूर -सांगवी(पंढरपूर) येथील वृद्धाचा शेतात कोरोना मुळे मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबातील सर्व लोक पॉझिटीव्ह असल्याने ते विलगीकरण कक्ष सेंटर पंढरपूर येथे उपचारासाठी दाखल असल्याने त्यांचे अंत्यविधी करिता कोणी इसम पुढे येत नसल्याने करकंब पोलीस ठाण्याचे PSI श्री मुंडे यांनी पुढाकार घेऊन सदर मयताचा अंत्यविधी त्यांचे जवळचे नातेवाईक सुन व जावई यांचे उपस्थित केला.


कोरोनाचा देशात प्रवेश झाल्यापासून अजतायागत पोलीस जनतेची सेवा करत आहेत. संचार बंदीच्या काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना पोलीस काठ्यांचा प्रसाद येताना आपण पाहिले आहे. अनेक समाजसेवी संस्था व्यक्ती आजच्या घडीला मृत्यु रुग्णांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी घेत आहेत. पंढरपुरातील त्या कोरोना रुग्णाच्या मृतदेहाला अग्नी देऊन आम्ही कशातच कमी नाही हे जणू महाराष्ट्र पोलिसांनी दाखवून दिले आहे.

Leave a Reply