barshiElection Newspimpalwadi

पिंपळवाडीच्या सरपंचपदी. जयश्री रमेश चौधरी तर उपसरपंचपदी. गोवर्धन चौधरी बिनविरोध

बार्शी – राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या  असलेल्या बार्शी तालुक्यातील पिंपळवाडी ग्रामपंचायच्या सरपंच पदी जयश्री रमेश चौधरी तर उपसरपंच पदी गोवर्धन चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली .दिनांक  26:2.2021 रोजी. बार्शी तालुक्यातील सरपंच उपसरपंचाच्या निवडी करण्यात आल्या पिंपळवाडी ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये अटी तटीची लढत झाली. यामधे माजी मंत्री. मा. दिलीप. सोपल साहेब प्रणित अन्नपूर्णा ग्राम विकास महाआघाडीचे 7पैकी 5उमेदवार बहुमताने विजयी झाले पिंपळवाडी ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदासाठी जयश्री रमेश चौधरी यांचा तर उपसरपंच पदासाठी गोवर्धन बाळनाथ चौधरी यांचा एक एक अर्ज  दाखल झाला होता.सरपंच पदाला जयश्री चौधरी यांना पूजा पांडुरंग चौधरी सूचक तर उपसरपंच पदासाठी गोवर्धन आप्पा यांना आजमुद्धीन मुलांनी हे सूचक राहिले या वेळी नवनिर्वाचित सदस्यामध्य आजमोदीन  मुलाणी  रेश्मा संदीप चौधरी पूजा पांडुरंग चौधरी रोहित. अनिल चौधरी हे उपस्थित होते या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जे  आर. कोळी विस्तार अधिकारी पंचायत समिती बार्शी ग्रामसेवक  के. व्ही  सुरुसे यांनी काम पहिले सदर निवड प्रक्रिया बिन विरोध करण्यासाठी रमेश तात्या चौधरी जेष्ठ नेते राजेंद्र दादा. चौधरी अंबादास सावकार अनुबा अण्णा  दत्तापाटील गोवर्धन माने परसराम पाटील  पाटिलराव तात्या लिंबाजी ओव्हाळ मधुकर माने भाऊसाहेब चौधरी राजकुमार चौधरी बुबासाहेब डांगे आण्याबा डांगे लक्ष्मण डांगे दिगंबर चौधरी मधू अण्णा महिवाल मुलाणी शिवाजी दादा बबन जीवनराव चौधरी विलास प्रभू चौधरी यांची भूमिका महत्वाची ठरली अन्नपूर्णा ग्राम विकास महाआघाडी चे उमेदवार  बहुमताने विजयी झाल्यामुळे ग्रामपंचायत समोर आनंद साजरा केला.

Abs News Marathi

Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!