पशुसंवर्धनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

सोलापूर-:  सोलापूरच्या जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत सन 2020-21 या वर्षामध्ये विविध योजनेतील वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येत आहेत. पात्र लाभार्थ्यांनी 11 जानेवारी 2021 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नवनाथ नरळे यांनी केले आहे.

विशेष घटक योजनेअंतर्गत अनुसूचीत जाती/ नवबौद्ध लाभार्थींना 75 टक्के अनुदानावर दोन दुधाळ जनावरांचे गट वाटप करणे, आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थींना 75 टक्के अनुदानावर शेळी गट वाटप करणे, आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थींना 75 टक्के अनुदानावर दोन दुधाळ जनावरांचे गट वाटप करणे या योजना राबविण्यात येत आहेत.

 

या योजनांसाठी लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत असून 11 डिसेंबर 2020 ते 11 जानेवारी 2021 अखेरपर्यंत पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती सर्व/ नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये अर्ज सादर करावेत. अर्जाचे नमुने जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर www.zpsolapur उपलब्ध आहेत.

इच्छुक पात्र लाभार्थींनी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीचे सभापती अनिल मोटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी केले आहे.

Leave a Reply