Headlines

परिक्षा शुल्क परत न दिल्यास विद्यापीठावर मोर्चा काढू – एसएफआय चा इशारा





सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर सोलापूर विद्यापीठाने सध्याच्या कोरोना प्रादुर्भाव शहर आणि ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात वाढत असल्याचा कारण पुढे करीत बी.ए, बी.कॉम, बी.एससी व इतर विभागातील विद्यार्थ्यांच्या  परिक्षा ऑनलाइन   पध्दतीने घेण्याचा निर्णय घेतला. पण विद्यार्थ्यांकडून ऑफलाइन  परिक्षा घेताना जेवढी परिक्षा शुल्क घ्यायचे तेवढीच परिक्षा शुल्क ऑनलाइन  परिक्षेसाठी घेतली जात आहे. मागच्या वर्षी ही मार्च महिन्यात सर्व विद्यार्थ्यांकडून आधीच परिक्षा शुल्क घेतले आणि त्यानंतर लाॅकडाऊन जाहिर करण्यात आले. विद्यार्थ्यांचा ऑफलाइन  तर सोडाच ऑनलाइन परिक्षा ही घेतली नाही.


कोरोना प्रादुर्भावमुळे गेल्या वर्षभरापासून पालकांच्या हाताला काम नाही. कामाचा वेळ ही कमी करण्यात आले आहे. सध्याला विद्यार्थ्यांना व पालकांना आॅनलाईन शिक्षण पध्दती परवडणारे नसतानाही पालकांनी विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. सर्व विद्यार्थ्यांचे परिक्षा शुल्क तात्काळ परत न केल्यास संघटनेकडून परिक्षार्थी विद्यार्थ्यांना घेऊन विद्यापिठावर मोर्चा काढू असा इशारा एसएफआयचे जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी यांनी दिला.  

 अशा आशयाचे निवेदन  स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) सोलापूर जिल्हा समिती च्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू यांना देण्यात आले.

                 यावेळी एसएफआयचे सहसचिव श्यामसुंदर आडम, उपाध्यक्ष विश्वजीत बिराजदार, मा. सचिवा मीरा कांबळे, जि. क. सदस्य अश्विनी मामड्याल, लक्ष्मी रच्चा, प्रशांत आडम इ. कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *