Breaking News

पत्रकार सुरक्षा समिती वतीने कोरोना योद्धा पुरस्कार चे वितरण

सोलापूर/अमीर आत्तार – जगात कोरोना रोगाने धुमाकूळ घातला असून त्याचे पडसाद सोलापुरात उमटले अजून पोलीस प्रशासन महसूल प्रशासन वैधकीय प्रशासन कोरोना रोगाला रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत त्यात संचार बंदी जमाव बंदी लॉक डाऊन सारख्या प्रभावी अस्त्राचा वापर करण्यात आला सोलापूर शहरात अनेक पत्रकारांनी आपला जीव धोक्यात घालून व कुटूंबाला बाजूला ठेवून कोरोना बाबत बातम्या करून आपला पत्रकारितेचा धर्म पाळला असून अश्या निर्भीड पत्रकारांच्या कौतुक होऊन त्यांच्या कार्याचा उचित सन्मान करणे आपले कर्तव्य असल्याचे प्रतिपादन पश्चिम महाराष्ट्र संघटक संतोष म्हेत्रे यांनी कोरोना पुरस्कार वितरण कार्यक्रम मध्ये बोलताना व्यक्त केलं आहे.

 या कार्यक्रम च्या अध्यक्षस्थानी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार होते यावेळी प्रदीप पेंदापल्लीवार, अंबादास येलगेटी, पद्मिनी येळणे, इम्तियाज अक्कलकोटकर, अमरसिंह गायकवाड शिवयोगी निंबाने तानाजी माने, बिपीन दिड्डी यांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन  संतोष म्हेत्रे यांच्या हस्ते  सन्मानित करण्यात आले यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख राजाभाऊ पवार शहर संपर्क प्रमुख वैजिनाथ बिराजदार अरुण सिडगिड्डी, अक्षय बबलाद भास्कर अल्ली, सतीश बलमेरी, श्रीनिवास पेद्दी, देडे, डॉ रवींद्र सोरटे, वहाब होटगीकर रियाज शेख जयप्रकाश पेद्दी बाबा काशीद उपस्थित होते. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!