Headlines

पत्रकार आरिफ शेख गुन्हा दाखल प्रकरणी चौकशी करण्याची पत्रकार सुरक्षा समितीची पोलीस आयुक्त यांच्याकडे मागणी



सोलापूर/अमीर आत्तार -साप्ताहिक शिवराज्य वृत्तपत्र चे उपसंपादक व वेगवेगळ्या माध्यमातून गेली अनेक वर्षापासून पत्रकारिता करणारे पत्रकार आरिफ शेख यांच्यावर वाहन खरेदी विक्री या व्यवसायमधून आर्थिक फसवणूक केली म्हूणन दिनांक 9/11/2020 रोजी 420/34 प्रमाणे फौंजदार चावडी पोलीस ठाण्यात काही इसमांनी खोटा गुन्हा दाखल केला असून या खोट्या गुन्ह्यांची चौकशी करण्यात येऊन खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या इसमावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी म्हूणन पत्रकार सुरक्षा समितीने पोलीस आयुक्त यांच्याकडे मागणी केली आहे

पत्रकार आरिफ शेख सारख्या प्रामाणिक पत्रकारांवर जर फसवणूक सारखे गंभीर गुन्हे दाखल होत असतील तर पत्रकारिता करायची कशी? असा प्रश्न प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी उपस्थित केला असून याप्रकरणी योग्य ती चौकशी करून आरिफ शेख यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांची चौकशी होऊन खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या इसमावर कारवाई करण्याची मागणी लावून धरली असून रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा यशवंत पवार दिला आहे.

पत्रकार आरिफ शेख गुन्हा दाखल प्रकरणी पोलीस उपायुक्त यांनी दिले चौकशी चे आदेश

पत्रकार आरिफ शेख यांच्यावर दाखल केलेल्या खोटा गुन्हा दाखल प्रकरणी पत्रकार सुरक्षा समितीच्या शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्त यांची भेट घेऊन मागणी केली होती त्या मागणी ची तात्काळ पोलीस उपायुक्त यांनी गंभीर दखल घेऊन खोटा गुन्हा दाखल प्रकरणी फेर चौकशी करण्याचे आदेश फौंजदार पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांला दिले आहेत.

यावेळी पत्रकार आरिफ शेख पत्रकार सुरक्षा समितीचे शहर अध्यक्ष अरुण सिदगिड्डी संपर्क प्रमुख राजाभाऊ पवार, वैजिनाथ बिराजदार, अक्षय बबलाद, इस्माईल शेख, इम्तियाज अक्कलकोटे, बिपीन दिड्डी, प्रदीप पेंदापल्लीवार, शब्बीर शेख, रोहित खारगे, आन्सर तांबोळी, युनूस तांबोळी रिजवान शेख, संभाजी गोसावी, बंडू तोडकर, अमर पवार, ज्ञानेश्वर गवळी, गोविंद शेंडगे, डॉ रवींद्र सोरटे, सोमनाथ मुंजे, रियाज शेख सह अनेक पत्रकार मोठया संख्येने पोलीस आयुक्त कार्यालयात उपस्थित होते.

Leave a Reply