Breaking Newslife style

पट्ट्या पडला पण अनेकांची मन जिंकून गेला

प्रतिंनिधी- आपण निवडणुकीत हरल्यानंतर हताश, निराश होतो. मात्र, लातूरमध्ये निवडणुकीत पराभूत झालेल्या एका युवा उमेदवाराने केलेले कृत्य बघून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.

लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील कोनाळी गावचा विकास शिंदे या युवकाने  काही दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आपले नशीब आजमावले.

मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीत संपूर्ण गावातून विकास शिंदेला केवळ 12 मते मिळाल्याने त्याचा पराभव झाला. 

तरीही त्याने निराश न होता त्याला मतदान करणाऱ्या 12 मतदारांचे गावात बॅनर लावून आभार व्यक्त केल्याने तो सोशल मीडियावर कमालीचा चर्चेचा विषय ठरला आहे.  

दरम्यान, त्याने बॅनर उभारुन सर्वांचे लक्ष वेधले आहे. बॅनरवर लिहिलेला मजकूर सर्वांना आश्चर्यचकित करणारा असून सध्या सोशल मीडियावर त्याचा हा बॅनर मोक्कार व्हायरल होत आहे. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!