पंप संच, पाईप लाईनसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 पंप संच, पाईप लाईनसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

सोलापूर- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातुन पंप संच आणि पाईप, तुषार संच देण्यात येणार आहे. त्यासाठी 7 ते 17 डिसेंबर 2020 दरम्यान ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर जावून अर्ज करावा.


            या योजनेतुन 10 एच.पी चा पंप संच दहा हजार रुपये मर्यादेत आणि दहा हजार रुपये पर्यंत पाईपसाठी अनुदान दिले जाणार आहे. जास्त अर्ज आल्यास ऑनलाईन सोडतीद्वारे तालुकास्तरावर लाभार्थी निवड केली जाईल अधिक माहितीसाठी तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविंद्र माने यांनी केले आहे.

Leave a Reply