Breaking News

पंढरपूर मधील खासगी लॅब मध्ये कोवीड 19 ची तपासणी

आमदार प्रशांत परिचारक यांनी घेतली डाॅक्टर आणि सर्व नगरसेवक यांच्या बरोबर बैठक
पंढरपूर/नामदेव लकडे – पंढरपूर शहरातील नागरिकांना covid-19 बाबतची  रॅपिड अँटीजन  तपासणी करण्यासाठी शहरातील विविध लॅबचे चालक डॉक्टर यांची मिटिंग आज आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या समवेत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एकनाथ बोधले, उपमुख्यअधिकारी सुनील वाळुजकर, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, आरोग्य समिती सभापती  विवेक परदेशी, पक्षनेते गुरुदास अभ्यंकर , नगरसेवक संजय निंबाळकर यांच्यासमवेत संपन्न झाली यावेळी डॉ एकनाथ बोधले यांनी उपस्थित डॉक्टर यांच्याशी चर्चा करताना पंढरपूर शहरांमध्ये कोरोना ग्रस्त पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता अनेक नागरिक खाजगी लॅबमध्ये ही तपासणी करू इच्छितात त्यामुळे  शासनाने खाजगी 5 लॅबधारकांना ही तपासणी सेवा उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासनाने गाईड लाईन दिलेले आहेत. 
   यामध्ये संबंधित लॅब नी सिव्हिल सर्जन सोलापूर यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्याचा आहे या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर त्यरीत  संबंधित लॅब  हे आपल्या लॅब मध्ये कोविड-19 ची तपासणी करू शकतात  यावेळी बोलताना आमदार  प्रशांतराव परिचारक यांनी सांगितले की,पंढरपूर शहरातील व तालुक्यातील, आसपासच्या  मोहोळ, मंगळवेढा, माळशिरस या तालुक्यातील नागरिकांना सुद्धा ही covid-19 ची तपासणी सेवा उपलब्ध होणार आहे त्यामुळे आपण प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवावा  व नागरिकांना कोविड 19 ची सुलभ सेवा उपलब्ध करून द्यावी असे आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!