Breaking News

पंढरपूर तालुक्यातील प्रत्येक गावात घेता येणार मा .आ.स्व .सुधाकरपंत परिचारकांच्या अस्थीकलशाचे दर्शन

पंढरपूर/नामदेव लकडे –  मा .आ.स्व.सुधाकरपंत परिचारकांच्या अस्थिकलश नागरिकांना दर्शनासाठी आज बुधवार दि. 19 ऑगस्ट 2020रोजी सकाळी ११.३०ते दुपारी २.वाजेपर्यंत विजापूर गल्लीमध्ये मुळ घरी ठेवण्यात येणार आहेत.
तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनाही अस्थीकलश दर्शन घेणेसाठी पंढरपूर तालुक्यातील सर्व  गावामध्येही मध्यवर्ती ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत .त्यामुळे त्यांचेवर भरभरुन प्रेम करणारे कार्यकर्त्यांनाही अस्थीकलश दर्शन मिळणार आहे. आज दिवसभर मा.आ. स्व .परिचारक मोठे मालक यांचा मृत्यू झाल्याची बातमी कळतात पंढरपूर शहरासह संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने शहर व तालुक्यातील कार्यकर्ता पोरका झाला आहे.
विजापूर गल्लीतील त्यांचा आसणारा वाडा कधीच ऐवढा वेळ बंद नसतो परंतु आज दिवसभर दरवाजा लावलेला दिसत होता.शहरातील पंचायत समिती पंढरपूर आणि विविध कार्यालया मध्ये त्यांच्या प्रतिमेस फुले वाहून श्रध्दांजली वाहताना दिसत होते प़ढरपूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सर्व कर्मचारी यांनीही श्रध्दांजली वाहिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!