Headlines

पंढरपुरातील “जनकल्याण’ हाॅस्पीटल ला कोव्हिड 19 रुग्णालयाचा दर्जा , कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार सुरू

पंढरपूर/नामदेव लकडे – पंढरपूर शहर व तालुक्‍यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. रुग्णांवर वेळेवर आणि तातडीने उपचार व्हावेत यासाठी जिल्हा प्रशासनाकडून येथील जनकल्याण हॉस्पिटलला कोव्हिड-19 चा दर्जा देण्यात आला आहे. तालुक्‍यातील पहिले खासगी कोव्हिड रुग्णालय सुरू झाल्याने रुग्णांची सोय झाली आहे. सध्या जनकल्याण हॉस्पिटलमध्ये 13 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जनकल्याण हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. सुधीर शिनगारे यांनी दिली. पंढरपूर शहर व तालुक्‍यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढू लागला आहे.

 सध्या वाखरी येथील कोव्हिड केअर सेंटर आणि उपजिल्हा रुग्णालयात कोव्हिड रुग्णांवर उपचार केले जात आहेत. रुग्णसंख्या वाढीचा वेग पाहता खासगी रुग्णालयाची गरज होती. येथील हॉस्पिटलमध्ये अनुभवी डॉक्‍टर आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी असल्यामुळे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी जनकल्याण हॉस्पिटलची कोव्हिडसाठी निवड केली आहे. सध्या हॉस्पिटलमध्ये 13 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 
शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून रग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत. आतापर्यंत पात्र रुग्णांना याचा लाभ मिळाला आहे.हॉस्पिटलमध्ये आयसीयू युनिट, प्राणवायू व 50 बेडची सोय करण्यात आली आहे. रुग्णसंख्येनुसार बेड उपलब्ध करून दिले जात आहेत. हॉस्पिटलमध्ये डॉ. अजित जाधव, डॉ. महेश लिंगे, डॉ. अंजली थोरात, डॉ. प्रदीप डोके, डॉ. ऋषीकेश गोगले, व्यवस्थापक सद्दाम मणेरी, सत्यवान बागल यांच्यासह 15 जणांचा स्टाफ रात्रंदिवस रुग्णसेवेसाठी कार्यरत आहे. हॉस्पिटलमध्ये 24 तास सेवा सुरू असून, कोव्हिड रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार सुरू आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसारच शुल्क आकारले जात असल्याचेही डॉ. शिनगारे यांनी सांगितले. 
वैद्यकीय साहित्य व पीपीई किटची गरज 

येथील रुग्णालयातील डॉक्‍टर व इतर कर्मचारी आपला स्वतःचा जीव धोक्‍यात घालून कोव्हिड रुग्णांवर उपचार करत आहेत. येथील डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांना पीपीई किट व इतर वैद्यकीय उपकरणांची गरज आहे. समाजातील संस्था व व्यक्तींनी यासाठी मदत करावी -डॉ. सुधीर शिनगारे,प्रमुख जनकल्याण हाॅस्पीटल

पंढरपूर शहर व तालुक्‍यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढू लागला आहे. सध्या वाखरी येथील कोव्हिड केअर सेंटर आणि उपजिल्हा रुग्णालयात कोव्हिड रुग्णांवर उपचार केले जात आहेत. रुग्णसंख्या वाढीचा वेग पाहता खासगी रुग्णालयाची गरज होती. येथील हॉस्पिटलमध्ये अनुभवी डॉक्‍टर आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी असल्यामुळे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी जनकल्याण हॉस्पिटलची कोव्हिडसाठी निवड केली आहे. सध्या हॉस्पिटलमध्ये 13 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून रग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत. आतापर्यंत पात्र रुग्णांना याचा लाभ मिळाला आहे.–सचिन ढोले,प्रांताधिकारी पंढरपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *