निसर्गाच्या संकटातून शेतकरी कसा तरी सावरत च आहे, परंतु माणसाच्या नीच प्रवृत्तीतून माणूस कधी उभरेल काय माहिती ?

उस्मानाबाद /युसूफ सय्यद – उस्मानाबाद तालुक्यातील खेड येथील शेतकरी श्री शिवाजी धोंडिबा पाटील यांच्या शेतातील सोयाबीन काढणी नंतर बांधला ढीग घालून ठेवलेला होता, काल रात्री अज्ञात दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तीने त्या झाकून ठेवलेल्या 2 एकर फडातील सोयाबीन ला आग लावली,

शेतकऱ्याने दुबार पेरणी करून कष्टाने आणलेले पीक स्वतःच्या डोळ्या पुढे राख झालेले पाहिले,ही घटना कोणी आणि का केली याची माहिती अद्याप भेटलेली नाही.आधीच अतिवृष्टी मुळे नुकसान झालेले असताना , शेतकर्‍यांनी अजून किती नुकसान सहन करावे , हा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे. 

Leave a Reply