Breaking News

नव्या शैक्षणिक धोरणाची एआईएसफ कडून होळी

बार्शी / प्रतिनिधी-  ऑल इंडिया स्टुडंन्टस् फेडरेशन, सोलापूर जिल्हा कौन्सिल च्या वतिने दिनांक 11 ऑगस्ट  रोजी नवे शैक्षणिक धोरण 2020 च्या ड्राफ्टची प्रत मा. राष्ट्रपतींना निवेदन  सादर करत होळी केली गेली.  सर्वांना मोफत, समान, सक्तीचे शिक्षण द्या अशी मागणी करण्यात आली. हे निवेदन  बार्शीचे मा. नायब तहसिलदार, मुंढे यांच्या  मार्फत देण्यात आले.  होळी ऑल  इंडिया स्टुडंन्टस् फेडरेशनच्या ऑफिस  समोर करण्यात आली. 

निवेदनात म्हणले आहे, नव्या शैक्षणिक धोरण चांगले आहे तर संसदेत न मांडता चर्चा न करता त्याची अधिसूचना का काढली, हे शैक्षणिक धोरण संविधानातील मूल्य विरोधी, शिक्षणाचे केंद्रीकरण, व्यापारीकरण,  धार्मिकीकरण करणारे असे आहे, ते जनतेवर लादले आहे. हे धोरण प्रसारमाध्यमांद्वारे जबरदस्तीने पोहचवले जात आहे, या धोरणाप्रमाणे देशातील 28 टक्के प्राथमिक शाळा बंद होतील,  स्वायत्ततेच्या नावाने शाळा, कॉलेजचे अनुदान बंद होईल, विद्यापीठ अनुदान आयोग सारख्या नियंत्रण संस्था बंद होतील,  एम. फिल. कोर्स बंद केल्याने संशोधनावर गंभीर परिणाम होईल,  विद्यापीठाची स्वायत्ता संपेल, विद्यापीठांमधून ऑनलाइन शिक्षण देण्यामुळे गरीब वंचितांना शिक्षणातून बेदखल केले जाईल, त्यातून खाजगीकरण शिणाचे बाजारीकरण होवून शुल्क वाढ होईल, विद्यापीठ स्वायत्ततेवरील हल्ला झाला आहे,  शिक्षणक्षेत्रातल्या नोकर्या धोक्यात येवनू संपून जातील,   आयआयएम, आयआयटी आणि आयएससी सारख्या एकल विषय संस्था बंद होऊन फक्त बहूविषय संस्था राहतील, नवीन धोरणानुसार सन 2035 पर्यंत उच्च शिक्षण घेणार्या युवकांचे प्रमाण केवळ 26 टक्के होईल, अनुदान बंद करण्यासाठी शैक्षणिक कर्ज योजना आनली आहे, शिक्षण मोफत करावे ही आमची तीव्र मागणी आहे. यावेळी, ए.आय.एस.एफ. चे काॅम्रेड पवन आहिरे, काॅ. आयाज शेख, काॅ. प्रविण मस्तुद,दिपक कोकाटे, प्रशांत शिंदे, सागर खडतरे, योगेश गावडे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!