Headlines

नगरसेवक विक्रम शिरसट यांनी केलेल्या आवाहनाला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद.

पंढरपूर/नामदेव लकडे -पंढरपूर शहरांमध्ये कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता होणारा संसर्ग रोखण्यासाठी व टाळण्यासाठी पंढरपूर नगरपालिकेचे नगरसेवक विक्रम शिरसट यांनी प्रभाग क्रमांक 4 व प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिकांच्या आरोग्याचे हीत लक्षात घेत या दोन्ही प्रभागातील नागरिकांना रॅपिड टेस्ट करून घेण्यासाठी अवाहन करण्यात आले होते सदर मोफत रॅपिड एंटीजन टेस्टचे नियोजन पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर व उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर वतीने दि 9 ऑगस्ट 2020 रोजी जुना नगरपरिषद सरकारी दवाखाना (क्रांती चौक) येथे सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत आयोजित करण्यात आली होती रॅपिड अँटिजिन टेस्ट करिता प्रभाग क्रमांक 4 व 5 मधील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून नगरसेवक विक्रम शिरसट यांनी केलेल्या आवाहनाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचं दिसून आले.

यावेळी विक्रम शिरसट यांनी पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक चार व पाच मधील कंटेनमेंट झोन असलेल्या गोविंदपुरा, रामबाग, जुनी पेठ, कोळी गल्ली, हरिदास वेस, भजनदास चौक, आदी भागात जाऊन नागरिकांना टेस्ट करून घेण्यासाठी विनंती केली होती याला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत नागरिकांनी न घाबरता आपली रॅपिड अँटिजिन टेस्ट करून घेतली आज पंढरपूर नगरपरिषद रुग्णालय येथे सुमारे 250 लोकांची रॅपिड टेस्ट घेण्यात आली यामध्ये 45 लोकांची टेस्ट पॉझिटिव्ह आली असून 205 लोकांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. सध्या पंढरपूर शहरामध्ये दिनांक 7 ऑगस्ट रोजी पासून ते 13 ऑगस्ट 2020 मध्यरात्रीपर्यंत लॉक डाऊन असून या लॉक डाऊन च्या काळामध्ये जास्तीत जास्त रॅपिड अँटिजिन टेस्ट करून चेस द व्हायरस हा उपक्रम राबवून येत्या काही दिवसातच पंढरपूर शहर कोरनामुक्त करण्याचा निर्धार पंढरपूर नगरपालिकेचे नगरसेवक विक्रम शिरसट यांनी केला आहे.

सदर उपक्रम राबवताना पंढरपूरचे कर्तव्यदक्ष प्रांताधिकारी व इन्सिडेंट कमांडर सचिन ढोले यांनी बहुमोल मार्गदर्शन केले असे विक्रम शिरसट यांनी सांगितले. या प्रसंगी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर साहेब माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव शिरसट उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांच्यासह नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

Leave a Reply