धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन मा अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध ठिकाणी रक्त दान शिबिर

पंढरपूर/नामदेव लकडे -धाराशिव साखर कारखाना युनिट१,२,३ चे चेअरमन मा.अभिजीत आबा पाटील यांच्या ३७व्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुक्यात विविध ठिकाणी मा.अभिजित आबा पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या दोन रक्तदान होत आहे. आज पटवर्धन कुरोलीत १०३ तर विसावा आढीव ५२ जणांनी रक्तदान केले.
डिव्हीपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत तालुक्यातील विविध सामाजिक उपक्रमातून अभिजीत आबा फाऊंडेशनने पंढरपूर भागातलोकांनी उस्फुर्त प्रतिसाद देऊन विक्रमी रक्तदान केले . रक्तदान हे श्रेष्ठदान वाचवतो इतरांचे प्राण हा संदेश घेऊन केलेल्या आव्हानास देत एकूण ६०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
डिव्हीपी उद्योग समूह नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतो .जागतिक कोरोनाच्या या संकट काळात आज रक्ताचा तुटवडा भासत आहे. रक्तदान शिबीर व सामाजिक उपक्रम राबवून एक नवा आदर्श ठेवला आहे.ह्या संकल्पनेला मित्र परिवारांनी भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल श्री.अभिजीत पाटील यांनी आभार मानले.

Leave a Reply