Headlines

धाराशिव साखर कारखाना देणार एफ आर पी पेक्षा शंभर रुपये अधिकचा दर -चेअरमन अभिजित पाटील यांची माहिती

पंढरपूर/ नामदेव लकडे -धाराशिव साखर कारखाना एफ आर पी पेक्षा शंभर रुपये अधिकचा दर देणार आहे 2018 व 2019 या वर्षात गाळप झालेल्या उसाला दर दिला जाणार आहे लवकरच ही रक्कम ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा होणार आहे अशी माहिती कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगितले.
त्यांनी सांगितले की सध्या देशात कोवीड 19 विषाणूच्या संसर्गामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे व आर्थिक परिस्थिती नाजूक झाली आहे कारखान्याने शंभर रुपये दिले यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत होणार आहे 2018-2019 हंगामात साखर निर्यात केली होती यामध्ये केंद्र सरकारकडून अनुदान देणे बाकी होते तरी सध्या चालू हंगामात पर्जन्यमान चांगले झाल्यामुळे ऊस वाढीसाठी अनुकूल वातावरण आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी दिलेल्या जादा ऊस बिल यामुळे शेतकऱ्यांनी ऊसासाठी खत औषध वापरून भरघोस उत्पन्न घ्यावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी केले व बिलासाठी शेती खात्याशी संपर्क करून खाते नंबर द्यावे असे आवाहन केले आहे.धाराशिव साखर कारखान्याचा आदर्श सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी द्यावा अशी चर्चा शेतकऱ्यांमधून बोलली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *