Breaking News

‘ती’ निराधार बार्शीत रडत फिरत होती ; भाऊसाहेबांनी तिला संभाळलं अन् आज तिचे हात पिवळे झाले !

प्रतिंनिधी – कोरोनाचे संकट देशावर घोंघावत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देश लॉकडाऊन केला होता. त्या लॉकडाउन काळामध्ये मुंबई येथून बार्शी येथे टेम्पोत बसून आलेली तरुणी बार्शी पोलिसांना आढळून आली, मात्र ती बार्शीत इतरत्र फिरत असताना पोलिसांनी बार्शी शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांना कल्पना दिली आणि आंधळकर यांनी त्या मुलीला आपल्या जवळ बोलावून घेतले ती मुलगी उत्तर प्रदेशातील असून त्या मुलीचे चुलते यांनी तिला मुंबईत आणून सोडून दिले होते. हे या अनाथ मुलीचा आज बार्शी शिवसेनेच्यावतीने इंदुमती आंधळकर अन्नछत्र याठिकाणी बार्शीतील एक युवक याच्याशी विवाह लावून दिला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, देशांमध्ये कडक लॉकडाउनची अंमलबजावणी चालू असताना निशा नवल भरती नावाची एक 28 वर्षीय तरुणी मुंबई वरून येणाऱ्या टेम्पो मध्ये बसून बार्शी येथे आली होती. ती तरुणी रात्री उशिरा टेम्पोतुन उतरल्यानंतर बार्शी शहरांमध्ये रडत फिरत होती. ही बाब पोलिसांच्या कानी आल्यानंतर तत्कालीन साहाय्यक पोलीस निरीक्षक बबन येडगे यांनी त्या महिलेला ताब्यात घेतले आणि विचारपूस केली असता तिने सांगितले की ती मूळ उत्तर प्रदेशातील असून मुंबई येथे चुलत्या समवेत आली होती आणि चुलत्याने तिला सोडून पळ काढला,

भिदरलेल्या अवस्थेमध्ये टेम्पोत बसली आणि बार्शीकडे आली. बरीच शोधाशोध केल्यानंतर त्या मुलीचा ठावठीकाणा लागेना मात्र उत्तर प्रदेश पोलिसांनी तिच्या गावात चौकशी केली असता तिचे आई-वडील लहानपणीच वारले आहेत आणि तिला कोणी नाही असे सांगितले. त्यानंतर पोलिसांपुढे प्रश्न होता की या मुलीचे काय करायचे, त्या नंतर सहाय्यक निरीक्षक येडगे यांनी शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांना याबाबत कल्पना दिली असता आंधळकर यांनी या मुलीचे पालकत्व सांभाळले आणि आपल्या अन्नछत्र यात कामाला असणाऱ्या राधाबाई नावाच्या महिलेकडे त्या मुलीला संगोपनासाठी दिली.

मात्र तिच्या भविष्याचे काय हा प्रश्न उभा ठाकला असता भाऊसाहेब आंधळकर यांनी त्यांच्या पाहुणे अमित रसाळ यांच्या हॉटेलमधील काम करणाऱ्या एका युवकास या युवती बरोबर लग्न संदर्भात विचारले असता तो युवक ही उत्तर प्रदेशातील असल्याने आणि तीस वर्ष बार्शीत स्थायिक असल्याने त्याने या युवतीशी विवाह करण्यास संमती दिली. आज युवक मनोज ठाकूर आणि युवती निशा भारती यांच्या विवाह लावून दिला या विवाह प्रसंगी की साहाय्यक पोलीस निरीक्षक बबन येडगे शिवसेना शहर प्रमुख दीपक आंधळकर शिवसेना उपशहर प्रमुख इलियास शेख,सगीर सय्यद, बापू तेलंग,शाहिद पठाण, ईश्वर साखरे, मॅक्स,  समीर सय्यद युवराज वाघमारे, इब्राहिम काझी,राज नानावटी,राजेंद्र मुळे,मोसिन सय्यद, ,सोनू नवगन, सादिक तांबोळी,अन्वर मुजावर,सोमनाथ कांबळे, अतुल इटकरजावेद पठाण, कालू शेख, सिद्धेश्वर, रमेश चौधरी, हबीब सय्यद, महेश साखरे, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!