तासगावंचे आरोग्यदूत निसार मुल्ला याना जीवनदाता पुरस्कार प्रदान  सांगली/सुहेल सय्यद


सांगली जिल्ह्यातील तासगावंचे आरोग्यदूत निसार मुल्ला याना कोल्हापूरच्या ग्रुप ऑफ मीडियातर्फे सामाजिक कार्याबद्दल जीवनदाता राज्यस्तरीय पुरस्कार आज कोल्हापूर येथे मा.मंगेश मंत्री संपादक, मराठी कलाकार माधुरी पवार तुझ्यात जीव रंगला अभिनेत्री मा.भाग्यश्री कालेकर,  सुनील पाटील, गौतम माळी, बाबासो जाधव यांच्या उपस्थितीत देण्यात आला. 

   

ग्रुप ऑफ मिडिया आणि सा. क्राईम डायरी च्या वर्धापदिनानिमित्त सामाजिक, राजकीय, व्यावसायिक, शैक्षणिक, प्रशासन, कृषी, वैद्यकीय क्षेत्रात उल्लखनीय कामगिरी करणाऱ्यांना देण्यात येतो. राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा कोल्हापूर मध्ये पर पडला.

विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित केले जाते. त्यानुसार यंदाही या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त श्री.निसार मुल्ला यांची  मीडिया ग्रुपच्या विशेष निवड समितीने जीवनदाता हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तासगावंचे आरोग्यदूत निसार मुल्ला हे गेली १५ वर्षे समाजात आधार नसणाऱ्या आणि गरीब कुटुंबातील व्यक्तींना मोफत औषधोपचार मिळवून देण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या या कार्याची अनेक संस्थांनी दखल घेऊन त्यांना पुरस्कार दिले आहेत. आतापर्यंत त्यांना १० पुरस्कार मिळाले आहेत. 

त्याबाबत श्री.मुल्ला म्हणले, की मी आजपर्यंत 485 लोकांची जाती पातीच्या पलीकडे जाऊन ही रुग्णसेवा केली असून त्याचे मला सर्वाधिक मानसिक समाधान व आनंद आहे. परमेश्वराने माझ्या हातून पुण्याईचे काम घेत आहे हे माझे भाग्य आहे अशा पुरस्कारामूळे मला आणखी काम करण्याचे बळ मिळते. अर्थात या पुरस्कारांमध्ये मला मदत करणारे अनेक डॉक्टर,सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि अनेक मित्रांचाही सिहाचा वाटा आहे.

Leave a Reply