Breaking News

तावशी येथे साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर संपन्नपंढरपूर/रविशंकर जमदाडे –  तावशी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त रामदास रणदिवे मित्रमंडळ , फ्रेंड्स ग्रुप , फकिरा बॉइज तावशी यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये एकूण ५१ रक्तदात्यांनी रक्तदान करून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना आदरांजली वाहिली.

 संयोजकांच्या वतीने प्रत्येक रक्तदात्यास वीस लिटरचा पाण्याचा जार भेट म्हणून देण्यात आला.या रक्तदान शिबिराचे उद्घाटन तावशीचे प्रतिष्ठित नागरिक बाळासो धोंडीबा  यादव ( काका ), दैनिक पुण्यनगरीचे पत्रकारमिलिंद ( दादा ) यादव ,पंढरपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती पुरुषोत्तम पवार पाटील , सोसायटी  चेअरमन भुजंगराव यादव, साधना विद्यालय तावशी चे माजी प्राचार्य व ग्रामपंचायत तावशी चे माजी सरपंच येदबा रणदिवे सर,सुरेश काका रणदिवे वायरमन,प्रकाश रणदिवे टेलर,अरुण रणदिवे,प्रा. रवी रणदिवे यांचे उपस्थित पार पडले.रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी  रामदास रणदिवे ,अमोल साठे , सुशील रणदिवे , बबलू पाटोळे , हेमंत सातपुते अधिक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!