तावशी येथे लोकसहभागातून उभारले “कोव्हिड केअर सेंटर”


पंढरपूर- कोविड रुग्णांची दररोजची वाढती संख्या पाहता उपचारासाठी रुग्णांची हेळसांड होऊ नये व कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना गावातच उपचार मिळण्याची सोय व्हावी या हेतूने तावशी (ता. पंढरपूर) येथे आज मंगळवार दि.११ मे रोजी सकाळी १० वाजता लोकसहभागातून आणि स्वेरी तथा श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे सर यांच्या सहकार्याने ५० बेडच्या ‘कोविड केअर सेंटर’चे उदघाटन करण्यात आले. यामुळे तावशी व परिसरातील रुग्णांवर उपचार करणे सोयीचे होणार आहे.  

            पंढरपुरचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते या कोविड सेंटरचे उदघाटन करण्यात आले.  कोविडचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून उपचारासाठी रुग्णांची धावपळ होऊ नये आणि त्वरित उपचार मिळावेत यासाठी तावशी मध्ये हे ‘कोविड केअर सेंटर’ उभारण्यात आले असून यातून तावशी मधील रुग्णांना उपचाराची सोय होणार आहे. याप्रसंगी तहसीलदार सुशिल वेल्लेकर, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण अवचर साहेब, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, ग्रामविकास अधिकारी ज्योती पाटील, स्वेरी कॅम्पस चे इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार, मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप धोत्रे, जेष्ठ समाजसेवक बाळासाहेब यादव, संभाजी ब्रिगेडचे किरण घाडगे, सरपंच गणपत यादव, उपसरपंच अमोल कुंभार, सर्व ग्रामपंचायत सदस्य, , ग्रामसेवक, तलाठी , सर्कल अधिकारी मोरे, आरोग्य सेवक, आशा वर्कर्स, ग्रामपंचायत कर्मचारी, तावशी ग्रामस्थ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply