Breaking News

तलाठी संघाकडून तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन सादर

मंगळवेढा / अमीर आतार- मंगळवेढा तालुका तलाठी संघाकडून मंगळवेढा तहसीलदार सो.यांना तलाठी संवर्गाच्या विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या लोकसभा निवडणुकीत मंगळवेढा तालुक्यातील सर्व तलाठी बांधवांनी निवडणुकीचे सर्व कामकाज केले असून वेतनानुसार बेसिक 100 %  निवडणूक भत्ता देण्यात यावा ही प्रमुख मागणी आहे व PM  किसान योजना ही कृषी विभागाची असून देखील त्याचे संपूर्ण कामकाज हे तलाठी करत आहेत सदर योजना ही कृषी विभागाकडे वर्ग करण्यात यावी व किसान योजनेबाबत अनेक त्रुटी व समस्या निर्माण होतात तरी याला तलाठी संवर्ग जबाबदार राहणार नाही व तलाठी कार्यालयाची अनेक ठिकाणी  दुरावस्था झाली आहे व काही गावात तलाठी कार्यालये नाहीत त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी व कार्यालयाच्या पडझडीमुळे दप्तराचे नुकसान होत आहे तरी याला तलाठी जबाबदार राहणार नाही व कार्यालयाच्या दुरूस्ती व बांधकामासाठी लागणारा निधी हा शासन स्तरावर मंजूर करावा अश्या मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!