Breaking NewsPolitics

डॉक्टर कफिल खान ला मुक्त करा – डीवायएफआय

सोलापूर – डॉक्टर कपिलखान हे गोरखपूर येथील बी आर डी मेडिकल कॉलेजच्या सरकारी दवाखान्यात प्रमुख डॉक्टर होते . 2017 मध्ये ठेकेदाराच्या लापरावाहीमुळे 63 बालकांचा ऑक्सीजन अभावी जीव गेला. त्यावेळी त्यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या आरोग्य विभागावर टीका केली. उत्तर प्रदेश सरकार त्यांना निलंबित केले.त्यांच्यावर केलेले आरोप चुकीचे असल्याचे नंतर सिद्द झाले. 
त्यानंतर उत्तर पोलिसांनी 29 जानेवारी 2020 रोजी मुंबई विमान तळावर त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक केली. CAA कायद्याच्या विरोधात भाषण केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. आजतायगत ते तुरुंगात आहेत. 
राष्ट्रीय सुरक्षा कायदा हा दहशतवादी , गुंड ,  अतिरेकी संघटना यांचे विरोधात वापरला जातो. केंद्र आणि राज्य सरकारे त्यांचा दुरोपयोग डॉक्टर ,  लेखक , कवी ,सामाजिक कार्य कर्ते  यांना तुरुंगात डांबण्यासाठी करत आहेत , असा आरोप डीवायएफआय केला आहे. 
डॉक्टर कपिल खान लवकरात लवकर मुक्त करा. आरोग्य व्यवस्थेचे राष्ट्रीयकरण करा. ह्या मागण्या घेऊन डीवायएफआय सोलापूर यांच्या वतीने सोलापूर येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी बापू साबळे , आप्पाशा चांगले , वसीम मुल्ला , दत्ता चव्हाण , विजय हरसुरे , मधुकर चिल्लाळ ,भारत दिलपाके आदि कार्यकर्ते उपस्थित होते. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!