AarogyaBreaking News

डॉक्टरांनो देवदूत आहात… देवदूतासारखे वागा -गणेश अंकुशराव


खासगी रुग्णालयातील डाॅक्टर हाॅस्पीटल मध्ये दाखल करण्यास टाळाटाळ करत असतील तर संपर्क साधण्याचे आवाहन

पंढरपूर /नामदेव लकडे : :-   सध्या कोरोनाच्या महामारीमध्ये सर्वसामान्यांना आधार देण्याचं काम करणं ही सद्यस्थितीत सर्वांचीच जाबाबदारी आहे. मुख्यत: ज्यांना देवदुत समजलं जातं, परमेश्‍वराचंच दुसरं रुप समजलं जातं अशा वैद्यकीय क्षेत्रातील कांही डॉक्टर मंडळींनी कोरोनाच्या या संकटकाळात सर्वसामान्य माणसांना लुटण्याचं कुकर्म सुरु केलंय. देवदुत समजले जाणारेच यमदुत बनत आहेत. सर्व डॉक्टर मंडळींना माझी नम्र विनंती आहे की, ‘‘कोरोना महामारीच्या काळात भरमसाठ फी घेवुन जनतेची लुट करु नये. आपल्याकडे आलेल्या रुग्णाला घाबरुन सोडू नये, माणुसकीनं वागावं. अन्यथा आम्हाला आमच्या पध्दतीनं तुम्हाला डॉक्टरकी कशी करायची हे शिकवावं लागेल!’’असा इशारा महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे.

हल्ली अनेक दवाखान्यात रुग्णांना साधा किरकोळ आजार असला तरी दाखल करुन घेतले जात नाही, अनेक रुग्ण यामुळे अंगावर आजार काढत आहेत, आजार बळावल्यानंतर रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयातच जाण्याचा सल्ला कांही डॉक्टर मंडळी देत आहेत आणि उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आवश्यक त्या सर्व मशिनरीज, सुविधा उपलब्ध असुनही येथे रुग्नांवर व्यवस्थित उपचार होत नाहीत. या सगळ्या भोंगळ कारभारामुळे काहीजणांना आपले प्राण गमवावे लागल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे. हे खुपच भयंकर आहे, माणुसकीला काळीमा फासणारे आहे. याला कुठं तरी चाप बसविण्यासाठी आम्ही महर्षी वाल्मिकी संघाचे सर्व कार्यकर्ते सरसावलो आहोत.

कांही डॉक्टर मंडळी रुग्णांना दवाखान्यात दाखल करुन घेतल्याबरोबर कांही डॉक्टर मंडळी रुग्णाच व त्यांच्या नातेवाईकांना दिलासा देण्याऐवजी घाबरवुन सोडतात आणि ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट व इको टेस्ट वगैरे अनेक अनावश्यक अशा महागड्या टेस्ट करायला भाग पाडतात. गरज नसताना महागडी गोळ्या, औषधे खरेदी करायला भाग पाडतात. कांही पॅथॉलॉजी लॅब, फार्मासिस्ट कंपन्या आणि डॉक्टर मंडळी यांची अभद्र युती आहे. आणि ही अभद्र त्रिकोणी युती सर्वसामान्यांना वाट्टेल तसे लुटत आहेत. कांही टोलेजंग हॉस्पिटल्स मध्ये सर्वसामान्यांनी आयुष्यभर कमावलेली जमापुंजी उपचाराच्या नावाखाली क्षणात लुटण्याचे गंभीर प्रकार घडताना आढळत आहेत. सद्यस्थितीत आधीच कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक अडचणीत असलेला सर्वसामान्य माणुस या लुटारु डॉक्टरांमुळे पुरता हवालदिल झाला आहे. इलाजापेक्षा मृत्यु परवडला अशी विचित्र अवस्था सर्वसामान्यांवर ओढवलेली आहे. याकडे डोळेझाक करुन प्रशासन जरी बसत असले तरी आम्ही बसणार नाही. बाकी आपल्या पेशाशी गद्दारी करुन स्वत:चे उखळ पांढरे करुन घेणारे सुज्ञ आहेत. असे रोखठोक प्रतिपादन गणेश अंकुशराव यांनी केले आहे.

सर्वसामान्य जनतेने जर कुठल्या डॉक्टर अथवा हॉस्पिटलकडून आपली आर्थिक पिळवणुक होत असेल किंवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये रुग्णास दाखल करुन घेण्यास टाळाटाळ होत असेल तर 9370271730, 9421961999 या क्रमांकावर माझ्याशी कधीही संपर्क करावा. असे आवाहन गणेश अंकुशराव यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!