Headlines

जिल्हा युवा महोत्सव शुक्रवारी ऑनलाईन पद्धतीने



सोलापूर : कोविड-19 च्या पार्श्वभूमीवरजिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीनेयुवकयुवतींसाठी 25 डिसेंबर 2020 रोजीऑनलाईन/ व्हर्च्युअल ‘गुगल मीट’ ॲपवर जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यातआल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.


इच्छुक शाळा, महाविद्यालय, युवक मंडळ यातील कलाकारांनी आपले अर्ज 24 डिसेंबर 2020 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या[email protected]n आणि[email protected]इमेलवर सादर करावेत. अर्ज पाठवताना व्हॉटस्ॲप क्रमांक आवश्यक असून अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी नदीम शेख (9422651337) आणि क्रीडा मार्गदर्शक सत्येन जाधव (9028095500) यांच्याशी संपर्क साधावा.


लोकनृत्य,लोकगीत,एकांकिका (इंग्रजी / हिंदी),शास्त्रीयनृत्य (भरतनाट्यम, ओडिसी, मणिपुरी, कथ्थक नृत्य, कुचीपुडी), शास्त्रीयगायन (हिंदुस्थानी किंवा कर्नाटकी ), शास्त्रीय वादन(सितार,बासरी,तबला,वीणा,मृदंग,हार्मोनियम (लाईट),गिटारबाबींच्या जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.


विजयी स्पर्धक विभागस्तर, राज्यस्तर महोत्सवासाठी पात्र ठरतील. कलाकारांसाठी वयोगट 15 ते 29 वर्षे असा असून त्यांचा जन्म 12 जानेवारी 1992 ते 12 जानेवारी 2006 कालावधीतील असावा. स्पर्धकाने प्रवेशिकेसोबत आधारकार्ड, जन्मदाखला जोडणे आवश्यक आहे. शाळेचे ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही. ऐनवेळी स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.


स्पर्धेतसहभाग घ्यावयाचा आहे त्यांनी सादर केलेल्या बाबीचे व्हिडीओ क्लिप तयार करून[email protected]आणि[email protected]इमेलवर पाठविणे आवश्यक आहे. एका कलाकाराला एका बाबीमध्ये फक्त एका वेळेला सहभागी होता येईल. मागील तीन वर्षात राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या कलाकारांना यावर्षी सहभागी होता येणार नाही. प्रवेश अर्जजिल्हा क्रीडा कार्यालयात, कुमठा नाका सोलापूर येथे उपलब्ध आहे, जास्तीत जास्त कलाकारांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन श्री. तारळकर यांनी केले आहे.

Leave a Reply