जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्याने मिळवला मेडिकल प्रवेश


सांगली/सूहेल सय्यद-मेडिकल प्रवेशाच्या परीक्षेत मूर्ती लहान पण बुद्धिचातुर्य महान आशा बुद्धी चातुर्याचा हिरा म्हणजे वरद शशिकांत पाटील. याने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर, कठीण परिस्थितीत, नीट परीक्षेत अभूतपूर्व असे घवघवीत यश मिळवून, एमबीबीएसला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जळगाव येथे प्रवेश मिळविला. 

     एकीकडे इतर विद्यार्थी लाखो रुपये खर्च करून क्लासेस लावतात, विशेष म्हणजे वरद ने कोणताही खाजगी क्लास लावला नाही. बाहेरून कुणाचे मार्गदर्शन नाही. केवळ आणि केवळ जिद्दीच्या व बुद्धीच्या जोरावर वरदने हे यश खेचून आणले आहे. वडील शशिकांत शहाजी पाटील एका संस्थेत ग्रंथपाल व आई मीनाक्षी पाटील ह्या गृहिणी सह खाजगी क्लास चालवतात. अशा कठीण परिस्थितीत त्याने हे यश मिळविले आहे. त्याची एकंदरीत शैक्षणिक वाटचाल ही अतिशय उज्वल परंपरेची आहे. चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. तसेच दहावीला 98% बारावीला, 94%  व सिईटीमध्ये 99.87 पर्सेंटाइल असे गुण घेऊन त्याने आत्तापर्यंत आपल्या शैक्षणिक वाटचालीत यश मिळविले आहे. व आपल्या यशाचा आलेख चढता ठेवला आहे. या सर्वांमध्ये उज्वल गोष्ट म्हणजे त्याने मेडिकल प्रवेश परीक्षेत (NEET) 572 गुण मिळवून मेडिकल ला प्रवेश मिळवला. सध्या त्याचा प्रवेशाची सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.

वरद पाटील म्हणाला, माझ्या या यशामध्ये आई वडील, कॉलेज शिक्षक,   यांच्या मोलाचा वाटा आहे. सहकार्यामुळेच इथे पर्यंत पोहचू शकलो. आता एमबीबीएस पूर्ण  करून पुढे पोटविकर तज्ज्ञ होणार आहे, व सामजिक सेवा करणारा आहे.

    याचा सत्कार विविध मान्यवरांच्या हस्ते केला गेला. यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य श्री.भालचंद्र सूर्यवंशी नाशिक, श्री खाजासो शेख, सौ नजमुन्निसा शेख, जैदअहमद शेख, मजहर शेख, शंकरराव कुलकर्णी, प्रभाकर वनखडे मुबारक मुलाणी, मोहम्मद मुजावर, इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply