Horoscope

जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य..

1. मेष : छोटे प्रवास घडतील. छोट्या आजारांवर लगेच उपचार करा. एखादी विशेष व्यवस्था करण्यात दिवस व्यतीत होऊ शकेल. 

2. वृषभ : अचानकपणे अनावश्यक पैसे खर्च होतील. घरात आनंदी वार्ता समजेल. ग्रहमानाच्या अनुकूलतेमुळे दिवस शुभ ठरू शकेल. 

3. मिथुन : कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी वाटेल. अतिथींच्या येण्यामुळे काही समस्यांना सामोरे जावे लागू शकेल.

4. कर्क : संपत्तीत भर पडू शकेल. मुलांकडून शुभवार्ता मिळतील. व्यवसायासाठी प्रगतीकारक दिवस. आप्तेष्टांचे सहकार्य लाभेल. 

5. सिंह : वैवाहिक जीवन सुखमय असेल. व्यापारी वर्गाने प्रामाणिकपणा, निष्ठा आणि मधु वाणीने सर्वांची मने जिंकू शकाल.

6. कन्या : एखादी नवीन गोष्ट शिकण्याची संधी मिळू शकेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. नोकरदार वर्गासाठी दिलासादायक दिवस. 

7. तूळ : चारही बाजूंनी मदतीचे हात पुढे येतील. एखादी भेटवस्तू मिळू शकेल. मान, सन्मान मिळतील. भाग्याची उत्तम साथ लाभेल.

8. वृश्चिक : तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला मोलाचा ठरेल. भविष्यात यातून फायदा मिळेल. दिवस आनंदात आणि उत्साहात व्यतीत होईल. 

9. धनु : न्यायालयीन प्रकरणांत सकारात्मक वार्ता मिळू शकतील. अचानक धनलाभाचे योग जुळून येत आहेत. यामुळे धनसंचय वाढू शकेल. 

10. मकर : व्यापारी वर्गासाठी शुभ दिवस. एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. प्रलंबित येणी प्राप्त होऊ शकतील. 

11. कुंभ : कीर्ती वृद्धिंगत होईल. मित्रांचे पूरेपूर सहकार्य लाभेल. विरोधक पराभूत होतील. सुवार्ता मिळतील. मानसिक शांतता आणि प्रसन्नता लाभेल. 

12. मीन : विवाहविषयक बोलणी पुढे सरकतील. विद्यार्थी वर्गाला यशकारक दिवस. भाग्य वृद्धिंगत होईल. घरातील वातावरण सौहार्दपूर्ण असेल. 

15 ऑक्टोबर 2020 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!