Headlines

जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य..

1. मेष : गेले काही दिवस झालेली चिडचिड कमी होईल. मनोरंजनात्मक वाचन होईल. आजचा दिवस चांगला जाईल.

2. वृषभ : मित्र व नातेवाईक कौतुक करतील. कामे सुरळीत पार पडतील. हस्तकलेला वाव मिळेल. सामाजिक जाणीव जागृत ठेवाल.

3. मिथुन : जिव्हाळ्याची व्यक्ति भेटेल. अनावश्यक खर्च कराल. दिवसाचा पूर्वार्ध चांगला जाईल. नोकरदारांना दिलासा मिळेल.

4. कर्क : अतिघाई करू नये. जोडीदाराचा सल्ला विचारात घ्या. स्वविचारात मग्न राहाल. जवळच्या व्यक्तींशी संपर्कातून चांगला मार्ग निघेल.

5. सिंह : कामाचा ताण जाणवेल. योग्य गुंतवणुकीला वाव आहे. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. संपर्कातील लोकांशी चांगला संवाद साधला जाईल.

6. कन्या : दिवस उत्तम जाईल. घरातील अडकलेली कामे मार्गी लागतील. झोपेची किरकोळ तक्रार जाणवेल. दिवसाचा पूर्वार्ध अनुकूल राहील.

7. तूळ : करमणूक प्रधान दिवस. मनातील इच्छा पूर्ण होईल. अधिकाराची महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल. कौटुंबिक गोष्टी समजूतदारपणे हाताळा.

8. वृश्चिक : घरगुती कामे करण्यात वेळ जाईल. नवीन विचारांना चालना मिळेल. मित्रांची योग्य वेळी मदत मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील.

9. धनु : रखडलेल्या कामात मदत मिळेल. अर्थाचा अनर्थ करू नका. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. व्यावसायिक येणी मिळतील.

10. मकर : बोलण्यातून गैरसमज टाळा. घरासाठी थोडी जास्त खरेदी होईल. भावंडांशी संवाद साधावा. कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहील.

11. कुंभ : दिवस इच्छेप्रमाणे घालवाल. बोलण्यावर संयम ठेवा. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. कार्यक्षेत्रात जबाबदार्‍या वाढतील.

12. मीन : घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. एखाद्या स्पर्धेत यश मिळेल. मन विचलीत होऊ शकते. उगाच त्रागा करू नका.

5 सप्टेंबर 2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *