Headlines

जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य..

1. मेष : आपल्या तत्वाला थोडी मुरड घालावी लागेल. जवळचा प्रवास करताना आरोग्याची काळजी घ्या. अकल्पित घटनांना धिटाईने सामोरे जा. 
2. वृषभ : बोलण्यात खंबीरपणा ठेवावा. तुमच्याबाबत इतरांचा गैरसमज होऊ शकतो. कौटुंबिक सौख्य लाभेल. कुटुंबातील सदस्यांचे मत जाणून घ्या. 
3. मिथुन : आवडत्या व्यक्तीची भेट होईल. काही निर्णयासाठी थांबावे लागेल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. व्यापारी वर्गाला भागिदारीतून लाभ मिळेल. 
4. कर्क : जोडीदाराच्या मताचा विचार करा. आळसात दिवस ढकलू नका. नवीन ओळखीचा लाभ होईल. भावनिक विचार करू नका. दैनंदिन कामात चिकाटी बाळगा.
5. सिंह : डोके शांत ठेवून काम करावे. नेटाने व्यायाम करावा. मन चंचल राहील. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. माणसे ओळखायला शिकावे.
6. कन्या : अधिकाराचा वापर योग्य ठिकाणी करावा. मानसिक संतुलन बिघडू देऊ नका. आहारावर नियंत्रण ठेवावे. मनातील इच्छा पूर्ण होईल.
7. तूळ : आपला दिवस आनंदात जाईल. लहान प्रवासाची शक्यता. मार्गदर्शक व्यक्तींच्या भेटीचा योग. कामातील तांत्रिक बाबी जाणून घ्याल. 
8. वृश्चिक : कुटुंबात अधिकार प्राप्त होईल. चांगल्या गोष्टीसाठी पैसा खर्च होईल. व्यवसाय वाढीसाठी तज्ञांचा सल्ला घ्या. महिला सहकार्‍यांची उत्तम साथ मिळेल.
9. धनु : जोडीदाराच्या सद्गुणांनी आनंद मिळेल. कर्ज फेडीचे एक पाऊल पुढे टाकाल. कामाच्या ठिकाणी तुमचा सल्ला मोलाचा ठरेल. 
10. मकर : आपल्या माणुसकीची इतरांना कल्पना येईल. धडपडया वृत्तीवर संयम ठेवावा. आहारावर नियंत्रण ठेवावे. प्रलंबित कामे पूर्ण करावीत. 
11. कुंभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. जुन्या मित्रमंडळींशी संवाद होईल. आपल्या वागणुकीने वाहवा मिळवाल. पालकांचा सल्ला मोलाचा ठरेल. 
12. मीन : घेतलेला निर्णय योग्य ठरेल. जोडीदाराशी असलेले मतभेद दूर होतील. भागीदारीतील व्यवसायातून लाभ होईल. धार्मिक आवड वाढीस लागेल. 
12 सप्टेंबर 2020 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *