Horoscope

जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य..

1. मेष : अति घाईमध्ये कोणताही निर्णय घेऊ नका. मनावर ताबा ठेवा. मित्रांना किंवा आप्तेष्टांना आर्थिक मदत कराल. गरजूंना मदत केल्याचे समाधान प्राप्त होईल. 
2. वृषभ : कार्य यशस्वी होणार आहे, फक्त आज मेहनत जास्ती करायला लागणार आहे. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस. समस्यांतून योग्य मार्ग निघू शकेल. 
3. मिथुन : दिवसभरात कामाची लगबग राहील. दिवसाचा उत्तरार्ध आनंदी जाईल. दुसऱ्यांच्या भावना समजून घ्याव्यात. मानसिक समाधान मिळेल. 
4. कर्क : धावपळीचा दिवस राहील. सर्व गोष्टीत समाधान मिळेल. स्वतःला सिद्ध करण्याच्या अनेक संधी प्राप्त होतील. मिळालेल्या संधीचे सोने करणे आपल्या हातात आहे.
5. सिंह : सरकारी कामे विनासायास मार्गी लागतील. प्रकृतीस जपा. आनंददायी दिवस. वादविवादात आपली सरशी होऊ शकेल. 
6. कन्या : आपल्या स्वतःवर विश्वास ठेवा. विजय तुमचाच राहील. कार्यक्षेत्रात अनेक जबाबदाऱ्या सक्षमतेने पार पाडाल. निराश न होता एक एक काम पूर्णत्वास न्याल. 
7. तूळ : कोणताही निर्णय घेण्यापूर्वी जोडीदाराचा निर्णय घ्या. घरामध्ये शांतता ठेवा. जुनी देणी फेडाल. गृहपयोगी आवश्यक वस्तूंची खरेदी कराल. 
8. वृश्चिक : नोकरी व्यवसायात नवीन काम मिळेल. नवचैतन्य उत्साहात दिवस जाईल. दिनक्रम व्यस्त राहील. दिवसाच्या सुरुवातीला महत्त्वाचे फोन, ईमेल यांच्यात वेळ जाईल.
9. धनु : दिवस कामात व्यस्त राहील. खर्चिक कामे आत्ता हाती घेऊ नका. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या पडतील. रचनात्मक व सृजनात्मक कार्यातील आवड वाढीस लागेल. 
10. मकर : नोकरीत सांभाळून निर्णय घ्या. कोणत्याही गोष्टीत हलगर्जीपणा करू नका. ऊर्जा आणि उत्साहवर्धक दिवस. कार्यक्षमता वृद्धिंगत होईल. 
11. कुंभ : आपले जुने नातेवाईक, मित्र यांच्याशी पुन्हा जुळलेला संपर्क आपल्या फायद्याचा ठरेल. टीकाकारांकडे दुर्लक्ष करून केवळ आपल्या कामांवर लक्ष केंद्रीत करावे. 
12. मीन : जुनी आणि बरेच दिवस रखडलेली कामे हळूहळू पुढे सरकतील. व्यायामात खंड पडू देऊ नका. दिवसाच्या सुरुवातीला काही छोटे धनलाभ संभवतात.
 15 सप्टेंबर 2020 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!