Horoscope

जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य..

 मेष : जोडीदाराशी सुसंवाद घडेल. मुलांबद्दल चांगली बातमी मिळेल. कार्यक्षेत्रात काही बदल घडून येतील. आत्मसन्मान बाळगून वागा.
वृषभ : बोलण्यात माधुर्य ठेवा. घरातील कामांना वेग येईल. व्यावसायिक गैरसमज टाळा. सामाजिक भान राखून वागावे. मानसिक शांतता लाभेल.
मिथुन : आपल्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. हरवलेली वस्तु सापडेल. जोडीदाराच्या कलेचे कौतुक कराल. दिनक्रम अतिशय व्यस्त राहील. 
कर्क : उत्तम कौटुंबिक सौख्य राहील. मानसिक गोंधळ टाळावा. जोडीदाराच्या मतांचा आदर करावा. समस्येतून प्रयत्नाने मार्ग काढावा. निराश होऊ नका. 
सिंह : गोष्टी मनासारख्या घडतील. मुलांशी सुसंवाद साधता येईल. गोड बोलून कार्यभाग साधावा. वाणीत माधुर्य ठेवावे. समस्यांचे निराकरण करण्याचा मार्ग सापडेल.
कन्या : उगाच नसत्या भानगडीत स्वत:ला गुंतवू नका. प्रेमातील गोष्टी लांबणीवर पडू शकतात. नोकरीत प्रशंसा होईल. मन  विचलीत होऊ देऊ नका. 
तूळ : घरातील जुन्या कामात अडकून राहाल. अटीतटिचे वाद वाढवू नका. वाचनात वेळ घालवावा. प्रलंबित कामात मित्रांची मदत घ्याल.  
वृश्चिक : घरातील जुन्या वस्तूंचा शोध घ्याल. व्यावसायिक कामात बदल जाणवेल. अभ्यासाचा कंटाळा करू नका. कामकाजात सुधारणा करण्याकडे लक्ष द्यावे. 
धनु : धार्मिक गोष्टींच्या सानिध्यात राहाल. जोडीदाराकडून अनपेक्षित लाभ मिळेल. धनवृद्धीचे संकेत मिळतील. स्वत:च्या हिंमतीवर मार्ग काढाल.  
मकर : अचानक धनलाभाची शक्यता. गरम वस्तूंपासून दूर राहावे. प्रवासात योग्यती खबरदारी घ्यावी. निष्काळजीपणा नुकसान करू शकतो. 
कुंभ : जुन्या गोष्टी मार्गी लागतील. ग्रहयोग वृद्धीकारक ठरेल. विरोधकांच्या कारवाया निष्प्रभ ठरतील. शिक्षण क्षेत्रात यश मिळेल. स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळेल.
मीन : घरासाठी मोठ्या वस्तूंची खरेदी कराल. मनातील इच्छा पूर्ण होईल. लहान आजारांकडे दुर्लक्ष करू नका. प्रयत्नांची कास सोडू नका.
 18 सप्टेंबर 2020 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!